नोव्हेंबरमध्ये येणार फोर्ड इकोस्पोर्टची फेसलिफ्ट एसयूव्ही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 07:00 AM2017-10-20T07:00:00+5:302017-10-20T07:00:00+5:30
फोर्डची इकोस्पोर्टचे २०१८ इकोस्पोर्ट सीरीजमधील फेसलिफ्ट मॉडेल पुढील महिन्यात सादर होण्याची शक्यता. त्याकडे एक नजर.
सध्या एसयूव्ही कार्सचा चांगलाच धडाका कार उत्पादक कंपन्यांनी लावला आहे. लोकांना एसयूव्हीचे आकर्षण अधिक असल्याचे लक्षात येत आहे, त्यामुळेच नवीन एसयूव्ही आणणे वा फेसलिफ्ट स्वरूपात काही वेगळ्या आकर्षणानी युक्त अशी एसयूव्ही सादर केली जाणे. हे सारे नित्याचेच झाले आहे. फोर्ड इंडियाने आता गेल्या काही काळापूर्वी सादर केलेल्या इकोस्पोर्ट या लोकप्रिय ठरलेल्या कॉम्पॅक्ट स्पोर्टी एसयूव्हीला पुन्हा नवा लूक देऊन भारतीय बाजारपेठेत आणण्याचे ठरवले आहे. किंबहुना यामुळे सध्याच्या इकोस्पोर्टलाही आणखी नक्कीच मागणी वाढू शकेल व नव्या इकोस्पोर्टमुळे या ब्रॅण्डचे आकर्षणही निर्माण होईल, असा सरळ हेतू यामागे आहे.
बहुधा २०२८ इकोस्पोर्टचे हे फेसलिफ्ट मॉडेल नोव्हेंबरमध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्याच महिन्यात हे फेसलिफ्ट लोकांच्या हातात पडू शकेल, अशी अपेक्षा आहे.
------------------------------
फेसलिफ्टमधील इंजिन विषयक अपेक्षित वैशिष्ट्ये
नव्या इंजिनाचा पर्याय
१.५ लीटर ३ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन (ड्रॅगन सीरीज )
पाच किंवा सहा गीयर देणार
१२५ बीएचपी व १५० एनएम टॉर्क
अन्य पर्याय
१.५ लीटर इंजिन टर्बोचार्जड टीडीसीआय
९८.६ बीएचपी व २०५ एनएम टॉर्क
५ हाताने टाकण्याचे गीयर
विद्यमान १ लीटरचे पेट्रोल इंजिनही एक पर्याय राहाणार
---
बाह्यांगताली अपेक्षित बदल
हेक्सागॉनल ग्रील
बम्पर व फॉग लॅम्पचा लूक बदल
ब्लॅक क्लॅडिंग संपूर्ण एसयूव्हीभोवती देणार
इन्फोटेन्मेंट सिस्टिम अधिक आधुनिक
व्हॉइस रेकग्निशन क्षमता
नेव्हिगेश सिस्टिम
---
ठळक वैशिष्ट्ये
क्रूझ कंट्रोल
वेग मर्यादा प्रतिबंधक
रेअर व्ह्यू पार्किंग कॅमेरा
हिल स्टार्ट असिस्ट
अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस)
ट्रक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (ईबीडी)
ड्युएल एअरबॅग्ज
ब्लाइंड स्पॉट मॉनिटरींग सिस्टिम