MG Hector, Kia seltos विसराल; Citroen ची पहिली कार भारतात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 08:09 AM2021-02-02T08:09:48+5:302021-02-02T08:28:08+5:30

Citroen C5 Aircross : Citroen ने नुकतीच La Maison concept वर आधारित १०शोरुम उघडण्याची घोषणा केली होती. कंपनीने पहिला शोरुम अहमदाबादमध्ये उघडला आहे. मार्चमध्ये मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, कोलकाता, चेन्नई आणि बंगळूरूमध्ये देखील शोरुम उघडण्यात येणार आहेत.

Forget about MG Hector, Kia Seltos; Citroen's first car Citroen C5 Aircross showcased in India | MG Hector, Kia seltos विसराल; Citroen ची पहिली कार भारतात दाखल

MG Hector, Kia seltos विसराल; Citroen ची पहिली कार भारतात दाखल

googlenewsNext

फ्रान्सची मोठी वाहन निर्माता कंपनी सिट्रॉनने (Citroen) भारतात पाऊल ठेवले आहे. Citroen C5 Aircross ची झलक कंपनीने दाखविली असून लवकरच ही कार भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. PSA Groupe ची ही दणकट आणि आकर्षक एसयुव्ही आहे. या कारची खास बाब म्हणजे या कारमध्ये 90 टक्के पार्ट्स हे भारतात बनविण्यात आलेले आहेत. यामुळे याची किंमत कमी ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. 


Citroen ने नुकतीच La Maison concept वर आधारित १०शोरुम उघडण्याची घोषणा केली होती. कंपनीने पहिला शोरुम अहमदाबादमध्ये उघडला आहे. मार्चमध्ये मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, कोलकाता, चेन्नई आणि बंगळूरूमध्ये देखील शोरुम उघडण्यात येणार आहेत. ला मॅन्शन म्हणजे अपना घर असा अर्थ होतो. कंपनीची ही योजना आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. कंपनीने नुकतीच सिट्रोन सी ५ एअरक्रॉसची झलक दाखविली आहे. या एसयुव्हीचे उत्पादन कंपनीने तामिळनाडूच्या थिरुवेल्लूर प्लांटमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. 


सिट्रोन सी ५ चा लूक तुम्हाला त्यांच्या जागतिक दर्जाच्या कारची आठवम करून देईल. या कारमध्ये कंपनीने 8 इंचाची टच स्क्रिन इंफोटेंमेंट सिस्टीम दिली आहे. यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोला जोडता येणार आहे. ड्य़ुअल टोन डॅशबोर्ड, पॅनारोमिक सनरुफ, 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ग्रिप कंट्रोल सिस्टिम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ड्युअल टोन 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील, ड्रायव्हर सीट मसाजर आदी फिचर देण्यात आले आहेत. 


सिट्रोन सी5 एयरक्रॉसच्या इंजिनमध्ये 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 177 बीएचपीची ताकद आणि 400 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करणार आहे. Citroen C5 18.6 किमीचे मायलेज देईल. इसमें 8 स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन गियरबॉक्स देण्य़ात आला आहे. सध्यातरी कंपनीने या कारच्या लाँचिंगबाबत घोषणा केलेली नसली तरीही ती मार्चमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही एसयुव्ही ह्युंदाई टक्सन, एमजी हेक्टरसारख्या कारना टक्कर देणार आहे. 

Web Title: Forget about MG Hector, Kia Seltos; Citroen's first car Citroen C5 Aircross showcased in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.