स्प्लेंडर विसरून जाल! 150 किमीच्या मायलेजवाली बाईक लाँच झाली; 250 किलोचे वजन नेते
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 04:50 PM2023-02-08T16:50:39+5:302023-02-08T16:50:49+5:30
ही गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बाईकला स्प्लेंडरसारखे कम्युटर मोटरसायकलचा लुक आणि डिझाइन देण्यात आले आहे.
होप इलेक्ट्रिकने हैदराबाद ई-मोटर शोमध्ये ईलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. तेलंगणा राज्य सरकारने हायटेक एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या या मोटर शोमध्ये HOP OXO ही मोटरसायकल सादर करण्यात आली. आकर्षक लुक आणि पॉवरफुल बॅटरी पॅकने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) या टॉप व्हेरिअंटसाठी 1.80 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे.
HOP OXO ही गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बाईकला स्प्लेंडरसारखे कम्युटर मोटरसायकलचा लुक आणि डिझाइन देण्यात आले आहे. फ्लॅश हेडलाइट, सिंगल सीट आणि दोन्ही चाकांवर असलेले डिस्क ब्रेक या बाईकला अपिलिंग बनवितात.
HOP OXO मध्ये 3.75 Kwh क्षमतेची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे. 850W स्मार्ट चार्जर द्वारे ती चार्ज करता येते. ही बॅटरी केवळ 4 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. यात 72 V क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 5.2Kw पॉवर आणि 185 Nm ते 200 Nm टॉर्क जनरेट करते. 95 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने ही स्कूटर धावू शकते. ही बाईक एका चार्जमध्ये 135 किलोमीटर ते 150 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज देते.
यामध्य BLDC हब मोटर देण्यात आली आहे. सायनसॉइडल FOC वेक्टर कंट्रोल आणि इको-पॉवर-स्पोर्ट आणि रिव्हर्स मोड देण्यात आले आहेत. लिस्कोपिक फोर्क फ्रंट सस्पेंशन, हायड्रॉलिक स्प्रिंग लोडेड शॉक शोषक रिअर सस्पेंशन, डिस्क ब्रेक आणि कॉम्बी-ब्रेक सिस्टमसह रीजनरेटिव्ह ब्रेकिंग देण्यात आली आहे. ही मोटरसायकलवर २५० किलोचे वजन नेऊ शकते.
5-इंचाचा स्मार्ट LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 4G LTE कनेक्टिव्हिटी देखील आहे. ही मोटरसायकल पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ट्वायलाइट ग्रे, कँडी रेड, मॅग्नेटिक ब्लू, इलेक्ट्रिक यलो आणि ट्रू ब्लॅक असे हे रंग आहेत. सध्या ही बाईक तेलंगानामध्ये उपलब्ध केली जाणार आहे.