मारुतीशी मैत्रीचाही फायदा होईना? टोयोटा स्वत:च्याच दोन कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात आणणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 05:06 PM2023-04-18T17:06:09+5:302023-04-18T17:08:36+5:30

टोयोटाने अर्बन क्रुझर चालली नाही म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच बंद केली होती. यानंतर कंपनीने मारुतीच्या ग्रँड विटाराला अर्बन क्रुझर हायरायडर म्हणून आणले आहे. परंतू एवढे करूनही टोयोटाला पाय रोवता येत नसल्याने कंपनीने आता आपलीच कार बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. 

Friendship with Maruti will not benefit? Toyota to bring its own two compact SUVs to India, register raize and raize space | मारुतीशी मैत्रीचाही फायदा होईना? टोयोटा स्वत:च्याच दोन कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात आणणार...

मारुतीशी मैत्रीचाही फायदा होईना? टोयोटा स्वत:च्याच दोन कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात आणणार...

googlenewsNext

स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल सेगमेंटने भारतीय बाजारात वेग पकडला आहे. साधारण पंधरा वीस वर्षांपूर्वी छोट्या कार घेणारे लोक आता या सेगमेंटकडे वळू लागले आहेत. यामुळे सर्वच कंपन्यांनी कॉम्पॅक्ट एसयुव्हीकडे आपला मोर्चा वळविला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या फोर्डने या सेगमेंटची सुरुवात केली होती ती आता देश सोडून गेली आहे. तर जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटाला काही केल्या या सेगमेंटमध्ये उतरता आले नाहीय. 

Tyre Burst Accident: भर वेगात टायर फुटण्यापासून स्वत:ला कसे वाचवाल? नंतर वेळ निघून गेलेली असते...

यामुळे आता टोयोटाने उशिरा का होईना मारुतीच्या साथीने या सेगमेंटमध्ये आपले नशीब आजमावण्याचे ठरविले आहे. टोयोटाने भारतीय बाजारपेठेसाठी दोन नवीन एसयुव्ही रेझ आणि रेझ स्पेस यांचा ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. मारुतीची ब्रेझावरून टोयोटाने अर्बन क्रूझर नावाने कार आणली होती. परंतू, तिला यथातथाच रिप्सॉन्स मिळाला आहे. 

यामुळे आता टोयोटा नवीन कोणती कार आणतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपलब्ध माहितीनुसार टोयोटाने Raize ला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रजिस्टर केले होते. हा नवा कोणता ट्रेडमार्क नाहीय. टोयोटाची या नावाने आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात एसयुव्ही आहे. या कारची लांबी चार मीटर आहे. यामुळे ही कार कंपनी ५ आणि सात सीटर ऑप्शनमध्ये आणण्याची शक्यता आहे. 

टोयोटाने अर्बन क्रुझर चालली नाही म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच बंद केली होती. यानंतर कंपनीने मारुतीच्या ग्रँड विटाराला अर्बन क्रुझर हायरायडर म्हणून आणले आहे. परंतू एवढे करूनही टोयोटाला पाय रोवता येत नसल्याने कंपनीने आता आपलीच कार बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. 

जपानी बाजारपेठेत रेझला कंपनीने 1.0 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे. इथल्या मार्केटमध्ये हे 1.5 लीटर K15C पेट्रोल इंजिनसह लॉन्च केले जाऊ शकते. ब्रेझाचेच इंजिन असल्याने मारुतीचेच सगळे वापरून कंपनी ते CNG प्रकारात देखील सादर करू शकते.
 

Web Title: Friendship with Maruti will not benefit? Toyota to bring its own two compact SUVs to India, register raize and raize space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.