90 किलोमीटर रेंज अन् किंमत 65 हजारांपेक्षा कमी; लॉन्च झाली स्वस्त EV स्कूटर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:58 PM2024-05-15T15:58:04+5:302024-05-15T15:59:00+5:30

कंपनीने या स्कूटरचे दोन व्हेरिएंट्स लॉन्च केले आहेत.

Fujiyama Electric Scooter: 90 km range and price less than 65 thousand; Cheap EV scooter launched | 90 किलोमीटर रेंज अन् किंमत 65 हजारांपेक्षा कमी; लॉन्च झाली स्वस्त EV स्कूटर, पाहा...

90 किलोमीटर रेंज अन् किंमत 65 हजारांपेक्षा कमी; लॉन्च झाली स्वस्त EV स्कूटर, पाहा...

Electric Scooter under 70000 : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच अनेक कंपन्या बाजारात आपली नवनवीन उत्पादने लॉन्च करत आहेत. अशातच आता भारतीय बाजारपेठेत एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची एन्ट्री झाली आहे. Fujiyama कंपनीने आपल्या Thunder Plus इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरिएंट्स(Thunder VLRA आणि Thunder LI.) लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्कूटरची किंमत 65 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Thunder VLRA 
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250 वॉटची मोटर दिली असून, याची टॉप स्पीड 25kmph आहे. तसेच, यात 48V 28AH VRLA बॅटरी असून, जी एका चार्जमध्ये 60 किलोमीटरची रेंज ऑफर करते.

Thunder LI Range
या व्हेरिएंटची टॉप स्पीडदेखील 25kmph असून, यातही कंपनीने सेम 250 वॉटची मोटर दिली आहे. पण, याची ड्रायव्हिंग रेंज VLRA मॉडेलच्या तुलनेत जास्त आहे. या स्कूटरमध्ये 60V 30AH VRLA बॅटरी दिली आहे, जी फुल्ल चार्जवर 90 किलोमीटरची रेंज ऑफर करते. 

Fujiyama Electric Scooter Features
या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कल्सटर, DRLसह LED लाइट्स, अँटी-थेफ्ट अलर्ट, रिमोट लॉक आणि अनलॉकसह मोबाइल चार्जिंगसारखे फिचर्स मिळतात. याशिवाय, यात पोर्टेबल बॅटरीचे फिचरदेखील आहे. म्हणजेच तुम्ही बॅटरी काढून आपल्या घरात चार्ज करू शकता.

या Electric Scooters शी स्पर्धा
Komaki Flora Price :
किंमत 64,999 रुपये (एक्स-शोरुम) आणि 80 ते 100 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज मिळते.

Okinawa R30 Price: किंमत 61,998 रुपये (एक्स-शोरुम)आणि 60 किलोमीटरची रेंज मिळते.

Web Title: Fujiyama Electric Scooter: 90 km range and price less than 65 thousand; Cheap EV scooter launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.