जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी भारतात पार्टनरच्या शोधात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:15 PM2024-07-02T12:15:00+5:302024-07-02T12:15:10+5:30

अति तांत्रिक युरोपियन वाहने भारतात विकण्यास कंपनीला यश आलेले नाहीय. या बाजारपेठेत कंपनी परवडणाऱ्या किंमतीतील वाहने उतरविण्याचा प्रयत्न करत आहे. यावर काम सुरु आहे.

General Motors, Ford now Volkswagen! The world's largest company failed in India, will searching for local Partner  | जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी भारतात पार्टनरच्या शोधात...

जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी भारतात पार्टनरच्या शोधात...

जगातील सर्वात मोठी कंपनी फोक्सवॅगनबाबत धक्कादायक बातमी येत आहे. जगात एक नंबरला असली ती या कंपनीला भारतात काही पाय रोवता आलेले नाहीत. 2 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक करूनही या कंपनीला भारतीय बाजारपेठेत यश आलेले नाही. यामुळे या कंपनीने भारतात स्थानिक भागीदार शोधण्यास सुरुवात केली आहे. जनरल मोटर्स, फोर्ड एक्झिटनंतरची ऑटोमोबाईलमधील सर्वात मोठी घडामोड ठरली आहे. 

फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले

अति तांत्रिक युरोपियन वाहने भारतात विकण्यास कंपनी अपयशी ठरली आहे. या बाजारपेठेत कंपनी परवडणाऱ्या किंमतीतील वाहने उतरविण्याचा प्रयत्न करत आहे. यावर काम सुरु आहे. परंतू, केलेली गुंतवणूक फळाला आली नसल्याने कंपनी वेगळा विचार करत आहे. 

फोर्डनेही आपला बिझनेस महिंद्रा सारख्या कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला होता. फोर्डलाही भारतात यश आले नव्हते. यामुळे अखेर कंपनीने भारतातून काढता पाय घेतला होता. त्यापूर्वी जनरल मोटर्सने देखील भारतात जम बसवू न शकल्याने भारत सोडला आहे. स्कोडाबाबतही दोन वर्षांपूर्वी असेच वृत्त होते. परंतू तेव्हा कंपनीने त्या अफवा असल्याचे म्हटले होते. स्कोडा हा फोक्सवॅगनचाच ब्रँड आहे. 

स्कोडा ऑटोचे जागतिक सीईओ क्लॉस झेलमर यांनी भारतीय बाजाराबाबत मोठे संकेत दिले आहेत. एकीकडे भारतीय बाजाराला इंधनावरील कारपासून हरित इंजिनकडे वळायला वेळ लागत असताना सरकारने ईलेक्ट्रीक वाहनांसाठी दबाव आणणे चुकीचे आहे. यापेक्षा हायब्रिड इंजिनवरील कर कमी करावा, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही गेल्या २० वर्षांपासून भारतात आहोत. परंतू योग्य मार्गावर असल्याचे सिद्ध करू शकलो नाही. जर एखादा योग्य भागीदार मिळाला तर आम्ही एकमेकांकडून शिकू शकतो, असे झेलमर म्हणाले. व्होक्सवॅगनशी चर्चा करण्याच्या स्पर्धेत महिंद्रा आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. 

युरोपियन कार बहुतेक वेळा "ओव्हर-इंजिनियर" असतात. याची भारतात आवश्यकता नाही. ओव्हर-इंजिनियरिंग नेहमी किंमतीच्या टॅगसह येते. यामुळे आमची वाहने भारतात इतरांच्या तुलनेत महाग असतात. यामुळे आम्ही मागे पडलो. आम्हाला शिकण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 
 

Web Title: General Motors, Ford now Volkswagen! The world's largest company failed in India, will searching for local Partner 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.