Global NCAP: कशी केली जाते कार्सची Crash Test, कोणत्या आधारावर दिले जातात ० ते ५ रेटिंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:30 PM2023-04-05T12:30:25+5:302023-04-05T12:33:46+5:30

What is crash test: तुम्ही कार घेताना तिच्या एन-कॅप रेटिंगबद्दल ऐकलं असेल. पण तुम्हाला माहितीये का ते रेटिंग कोणत्या आधारे दिलं जातं?

Global NCAP How Cars Are Crash Tested Based On Which 0 To 5 Ratings Are Given know ncap rating process maruti suzuki skoda | Global NCAP: कशी केली जाते कार्सची Crash Test, कोणत्या आधारावर दिले जातात ० ते ५ रेटिंग?

Global NCAP: कशी केली जाते कार्सची Crash Test, कोणत्या आधारावर दिले जातात ० ते ५ रेटिंग?

googlenewsNext

Global NCAP Crash Test Process: नुकतेच मारुती सुझुकीच्या दोन कार - मारुती सुझुकी वॅगनआर आणि अल्टो K10 चे सेफ्टी रेटिंग समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सी ग्लोबल NCAP नं त्यांना क्रॅश टेस्टमध्ये १ स्टार आणि २ स्टार रेटिंग दिलंय. याशिवाय फोक्सवॅगन आणि स्कोडा सेडान कारचीही क्रॅश चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांना ५ स्टार रेटिंग मिळालं. अशा स्थितीत वाहनांची क्रॅश टेस्ट कशी केली जाते आणि कोणत्या आधारावर त्यांना ० ते ५ असे रेटिंग दिले जाते, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.

ग्लोबल एनकॅप (New Car Assessment Program) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी वाहनांच्या सुरक्षा मानकांची तपासणी करते. वाहनांची सुरक्षा वाढवणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेकडून वाहनांची क्रॅश चाचणीद्वारे चाचणी केली जाते. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये, वाहन मर्यादित वेगानं चालवलं जातं आणि एका ठिकाणी आदळवलं जातं. यानंतर, वाहनाच्या बाहेरील आणि आतील बाजूची तपशीलवार तपासणी केली जाते आणि त्यांना रेटिंग मिळतं.

कशी होते चाचणी?
क्रॅश टेस्ट करण्यासाठी त्याच्या आत एक डमी ठेवला जातो. हा डमी माणसाप्रमाणे कारमध्ये बसवला जातो. ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचणीमध्ये, कार ६४ किमी प्रतितास वेगानं चालविली जाते आणि समोरील बॅरिअरवर धडकवली जाते. ही टक्कर अशा लेव्हलची असते जसं समान वजनाची दोन वाहनं ताशी ५० किलोमीटर वेगानं एकमेकांना धडकतात. क्रॅश चाचणी अनेक प्रकारे करण्यात येते. ज्यात फ्रंटल, साईडल, रिअर आणि पोल टेस्ट यांचा समावेळ आहे. फ्रंटल टेस्टमध्ये कार समोरच्या बाजूनं आदळवली जाते. साईडल टेस्मटमध्ये साईनं, रिअर टेस्टमध्ये मागील बाजूनं आदळवतात आणि पोल टेस्टमध्ये कार वरील बाजून पाडली जाते. 

कशी मिळते रेटिंग?
एनकॅप अंतर्गत कारला ० ते ५ दरम्यान स्टार रेटिंग दिली जाते. जितकं अधिक रेटिंग तितकी कार सुरक्षित मानली जाते. हे रेटिंग ॲडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन, चाईल्ड ऑक्युपमेंट प्रोटेक्शन स्कोअरवर आधारित आहे. 

ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन
यासाठी १७ गुण ठेवण्यात आले आहेत. आदळताना व्यक्तीच्या शरीराला होणाऱ्या दुखापतींच्या आधारे यात गुण दिले जातात. यासाठी त्याची ४ भागांमध्ये विभागणी केली जाते.

  • हेड अँड नेक
  • चेस्ट अँड क्नी
  • फिमर अँड पेल्विस
  • लेग अँड फूट
     

चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन
यासाठी ४९ गुण ठेवण्यात आले आहेत. यासाठी कारमध्ये १८ महिन्यांचं बाळ आणि ३ वर्षांच्या मुलाचा डमी ठेवला जातो. कारमध्ये चाईल्ड रेस्ट्रेंट सिस्टम मार्किंग, थ्री पॉईंट सीट बेल्ट आणि ISOFIX साठी अतिरिक्त गुण देण्यात आलेत.

Web Title: Global NCAP How Cars Are Crash Tested Based On Which 0 To 5 Ratings Are Given know ncap rating process maruti suzuki skoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.