मायलेजच्या बाबतीत भारी, किंमतीच्या बाबतीत लै भारी; पाहा स्वस्त आणि मस्त बजेट फ्रेंडली बाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 04:46 PM2022-03-24T16:46:29+5:302022-03-24T16:48:15+5:30

अनेकांचा कल सध्या स्वस्त आणि अधिक मायलेज देणाऱ्या गाड्यांकडे आहे. पाहूया अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या.

good mileage cheap price hero hf deluxe to tvs sport bajaj platina top 3 motorcycle under 60000 rupees in india know more | मायलेजच्या बाबतीत भारी, किंमतीच्या बाबतीत लै भारी; पाहा स्वस्त आणि मस्त बजेट फ्रेंडली बाईक्स

मायलेजच्या बाबतीत भारी, किंमतीच्या बाबतीत लै भारी; पाहा स्वस्त आणि मस्त बजेट फ्रेंडली बाईक्स

googlenewsNext

भारतीय बाजारपेठेतील स्वस्त मोटरसायकलची मागणी सातत्यानं वाढतानाच दिसत आहे. इलेक्ट्रीक टू व्हीलरची संख्या वाढत असली तरी लोक अजूनही कम्युटर बाईक्स खरेदी करत आहेत. Hero पासून Bajaj आणि TVS पर्यंत या कंपन्या सर्वसामान्यांना परवडतील अशा बाईक्सचीही विक्री करतात. आज आपण अशा बाईक्स पाहू ज्याची किंमत ६० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.

1. Hero HF Deluxe
Hero HF Deluxe ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक आहे. या बाईकची किंमत 54,650 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. या बाइकमध्ये 97.2 cc इंजिन देण्यात आलं असून ते 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने त्याचे डिझाइन अगदी सोपं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याला पुढील आणि मागील बाजूस 130mm ड्रम ब्रेक मिळतात. HF Deluxe बाईकचे वजन 112 किलो आहे आणि तिची फ्युअल टँक क्षमता 9.6 लिटर आहे. ही बाईक 65 किमी/लि पर्यंत मायलेज देते.

2. Bajaj Platina 100
बजाज प्लॅटिना 100 ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या 100 सीसी बाईकपैकी एक आहे. त्याची किंमत 54,650 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. यामध्ये सेल्फ-स्टार्ट फीचर, मोठी सीट आणि बेस्ट इन क्लास मायलेज मिळते. बाईकमध्ये 7.79 bhp पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क जनरेट करणारे इंजिन देण्यात आलंय. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक्ससोबत, बजाज प्लॅटिना कंबाईन ब्रेकिंग सिस्टमसह येते. बाईकचे वजन 119 किलोग्रॅम आहे आणि यात 11 लिटरचा फ्युअल टँक देण्यात आलाय. ही बाईक 75 किमी/लि पर्यंत मायलेज देते.

3. TVS Sport
ही देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाइक्सपैकी ही एक आहे. त्याची किंमत 59,130 ​​रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. ही बाईक 2 व्हेरिअंट आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. TVS Sports मध्ये 109.7cc इंजिन देण्यात आलंय जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. TVS स्पोर्टला पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतात. या स्पोर्ट बाईकचे वजन 112 किलो आहे आणि त्यात 10 लिटरचं फ्युअल टँक देण्यात आलेय. ही बाईक 75 किमी/लि पर्यंत मायलेज देते.

Web Title: good mileage cheap price hero hf deluxe to tvs sport bajaj platina top 3 motorcycle under 60000 rupees in india know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.