खूशखबर! इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलवर एक्साईज ड्युटी रद्द; केंद्राचा दिलासा देणारा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:51 PM2022-07-05T14:51:33+5:302022-07-05T14:52:39+5:30
महिनाभर आधी ऑईल मार्कोटिंग कंपन्यांनी इथेनॉल ब्लेंडिंगच्या सरकारच्या लक्ष्याकडे जाताना ९.५ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. तर आता १० टक्के लक्ष्य गाठले आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल वापरणाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. ज्या पेट्रोलमध्ये १२ ते १५ टक्के इथेनॉल मिक्स असेल त्यावर एक्साईज ड्युटी द्यावी लागणार नाही. पर्यायाने हे पेट्रोल स्वस्त मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने आज याचे नोटिफिकेशन जारी केले आहे.
इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलच्या वापराला मागणी वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार अर्थ मंत्रालयाच्या या नोटिफिकेशनवर माहिती देताना म्हटले की पेट्रोलवर अक्साईज ड्युटी नाही तर त्यात मिसळल्या जाणाऱ्या १२-१५ टक्के इथेनॉलवर एक्साईज ड्युटी घेतली जाणार नाहीय.
उदा. जर तुम्ही १०० लीटर इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल घेतला, तर तुम्हाला १२ ते १५ लीटर इथेनॉलवर एक्साईड ड्युटी माफ केली जाणार आहे. तर उर्वरित ८८ लीटर पेट्रोलवर एक्साईज ड्युटी आकारली जाणार आहे. ती आधीसारखीच अ,णार आहे.
महिनाभर आधी ऑईल मार्कोटिंग कंपन्यांनी इथेनॉल ब्लेंडिंगच्या सरकारच्या लक्ष्याकडे जाताना ९.५ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. तर आता १० टक्के लक्ष्य गाठले आहे. आता सरकारला याहून पुढे जाण्याची इच्छा आहे.