Fortuner च्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; कंपनीने लॉन्च केले नवीन एडिशन, जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 06:06 PM2024-04-22T18:06:51+5:302024-04-22T18:07:08+5:30
Toyota Fortuner Leader Edition Launch in India: भारतात टोयोटा कंपनीच्या Toyota Fortuner गाडीची खुप क्रेझ पाहायला मिळते.
Toyota Fortuner Leader Edition Launch in India : भारतात टोयोटा कंपनीच्या फॉर्च्युनर( Toyota Fortuner) गाडीची खुप क्रेझ पाहायला मिळते. विविध पक्षातील नेते आणि सेलिब्रिटी या गाडीचा वापर करतात. भारतातील महागड्या गाड्यांपैकी ही गाडी आहे. आता टोयोटा-किर्लोस्करने फॉर्च्युनरच्या चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने फॉर्च्युनरचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे.
कंपनीने भारतात पहिल्यांदा 2009 मध्ये फॉर्च्युनर लॉन्च केली होती. तेव्हापासून या कारच्या 2.5 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. कारच्या या यशस्वी विक्रीनंतर कंपनीने या कारचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे. कंपनीने आपल्या नवीन Fortuner LEADER EDITION मध्ये काही नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जोडले आहेत. यासोबतच कारच्या बाहेरील भागाला ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे.
मिड एसयूव्ही फॉर्च्युनरचे नवीन एडिशन
कंपनीने मध्यम साईज एसयूव्ही फॉर्च्युनरचे नवीन एडिशन लॉन्च केले आहे. आता तुम्हाला तुमची आवडती फॉर्च्युनर नवीन लीडर एडिशनमध्ये मिळाले. कंपनीने फॉर्च्युनरच्या नवीन एडिशनच्या डिझाईनमध्ये बदल केले असून, काही नवीन फीचर्सही जोडले आहेत.
फॉर्च्युनर लीडर एडिशनमध्ये काय बदलले
कंपनीने कारच्या बाहेरील भागात काही बदल केले आहेत. कारच्या पुढील आणि मागील बाजूस बंपर स्पॉयलर देण्यात आले आहेत. याशिवाय सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ड्युअल टोन एक्सटीरियर. आता फॉर्च्युनर लीडर एडिशन ड्युअल टोन रंगासह उपलब्ध असेल. या नवीन एडिशनची किंमत 36-40 लाख रुपयांदरम्यान असू शकते.
याशिवाय कंपनीने इंटेरिअरमध्येही बरेच बदल केले आहेत. आतील भागात ड्युअल टोन सीट्सचा पर्याय उपलब्ध आहे. ड्रायव्हरच्या सीटला जास्त उंची देण्यात आली आहे. याशिवाय नवीन एडिशनमध्ये वायरलेस चार्जर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. याशिवाय फॉर्च्युनरच्या नवीन एडिशनमध्ये ब्लॅक अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे कारचा लूक अधिक बोल्ड झाला आहे.
पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल नाही
या कारमध्ये 2.8 लीटर डिझेल इंजिन आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले, तर ही कार जास्तीत जास्त 500 Nm टॉर्क आणि 204 PS ची कमाल पॉवर जनरेट करते. पण मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही कार जास्तीत जास्त 420 Nm टॉर्क आणि 204 PS पॉवर जनरेट करते. हे नवीन एडिशन 4*2 प्रकारासह येते.