टाटा टियागो ईव्ही मालकांसाठी खुशखबर! IPL सामन्यानंतर खेळाडूंना ट्रॉफी देता येणार, तिकिटेही फुकट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 04:22 PM2023-04-01T16:22:55+5:302023-04-01T16:23:41+5:30
जेवढ्या वेळा टाटा टियागोला मैदानाबाहेर भिरकावलेला बॉल लागेल, तेवढ्या वेळा टाटा ५ लाख रुपये देणार... कशासाठी? कारण कौतुकास्पद...
आयपीएल सुरु झाली आहे. आयपीएलचा सर्वात मोठा स्पॉन्सर टाटा ग्रुप बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा ऑफिशिअल पार्टनर टाटा टियागो ईव्हीला बनविण्यात आली आहे. यामुळे याचा टाटानेही फायदा उचलण्याचे ठरविले आहे. टाटा ईव्ही मालकांसाठी चांगली बातमी आहे.
कंपनीने आयपीएल मॅचदरम्यान टियागो ईव्ही कार १२ स्टेडिअममध्ये डिस्प्ले करणार आहे. सोबतच ऑडियन्सना याच्याशी कनेक्ट करण्यासाठी एक रोमांचक कॉन्टेस्ट सुरु करणार आहे. टाटा आपल्या ईव्ही ग्राहकांना मॅचनंतरच्या प्राईज सेरेमनीमध्ये खेळाडूंना ट्रॉफी देण्याची संधी मिळणार आहे. सोबतच काही आयपीएल मॅचसाठी मोफत तिकिटेही दिली जाणार आहेत.
आयपीएल टूर्नामेंटमध्ये ‘100 reasons to go. ev with Tiago.ev’ कँपेन चालविले जाणार आहे. याचा उद्देश इलेक्ट्रीक कार घेण्याबाबत त्यांच्या मनातील मिथके तोडण्यासाठी केला जाणार आहे.
खेळाडूला मिळणार टियागो ईव्ही...
कंपनीने सर्व मॅचमध्ये जो खेळाडू सर्वात वेगाने रन्स बनवेल म्हणजेच ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल त्याला कॅश प्राईज आणि टाटा टियागो ईव्ही दिली जाणार आहे. एवढेच नाही तर जेवढ्या वेळा मैदानाजवळ ठेवलेल्या कारला बॉल लागेल तेवढ्या वेळा टाटा वृक्ष लागवड करण्यासाठी कर्नाटकमध्ये कॉफीच्या बागांमध्ये जैव विविधता वाढविण्यासाठी ५ लाख रुपये दान करणार आहे. गेली सहा वर्षे टाटा आय़पीएलला स्पॉन्सर करत आहे, परंतू यावेळची योजना काही वेगळीच आहे.