FZ प्रेमींसाठी खुशखबर! Yamaha ने 19,300 रुपयांपर्यंत या दोन धासू बाईकच्या किंमती घटविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 02:30 PM2021-06-02T14:30:37+5:302021-06-02T14:32:18+5:30
Yamaha FZS 25, FZ 25 Price cuts: Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 2004V या 180-200 सीसी मोटरसायकलींची किंमत आणि यामाहाच्या या 250 सीसी मोटरसायकलींची किंमत आता जवळपास एकसारखी झाली आहे.
प्रमुख दुचाकी कंपनी Yamaha ने ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. कंपनीने FZ25 सीरीजच्या मोटारसायकलींची किंमत मोठ्या फरकाने कमी केली आहे. इंडिया यामाहा (India Yamaha) ने Yamaha FZ25 आणि Yamaha FZS25 किंमती कमी केल्या आहेत. आता Yamaha FZ25 ची नवी किंमत 1,34,800 रुपये तर FZS25 ची किंमत 1,39,300 रुपये एक्स शोरुम झाली आहे. (Two-wheeler major Yamaha India has announced a price cut for its two models - FZ 25 and FZS 25.)
आधी या Yamaha FZ25 ची किंमत 1,53,600 रुपये आणि Yamaha FZS25 ची किंमत 1,58,60 रुपये होती. यामध्ये FZ25 च्या किंमतीत 18,800 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर FZS25 च्या किंमतीमध्ये 19,300 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
Car Care Tips: नवी असो, जुनी असो! दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये नक्की कार काम देणार; ही काळजी जरूर घ्या...
यामाहाच्या या कपातीमुळे या मोटारसायकली 250 सीसीच्या सेगमेंटमध्ये खूप स्वस्त झाल्या आहेत. एवढेच नाही तर Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 2004V या 180-200 सीसी मोटरसायकलींची किंमत आणि यामाहाच्या या 250 सीसी मोटरसायकलींची किंमत आता जवळपास एकसारखी झाली आहे.
का स्वस्त केल्या किंमती....
कंपनीनुसार Yamaha FZ25 आणि Yamaha FZS25 च्या किंमती कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे या बाईकचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. यामुळे याचा फायदा ग्राहकांना दिला जात आहे. किंमत कमी झाली तरीदेखील याचा परिणाम या बाईकच्या फीचर्सवर होणार नाहीय.