Mahindra Electric Cars: खुशखबर! इंधनावरील खर्च वाचविण्यासाठी स्वदेशी कंपनी आणणार दोन जबरदस्त इलेक्ट्रीक कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 02:08 PM2021-11-29T14:08:21+5:302021-11-29T14:08:55+5:30
Mahindra's Upcoming Electric Cars: देशात येत्या काळात इलेक्ट्रीक कारची मोठी मागणी वाढणार आहे. सध्या टाटा नेक्सॉन ईव्हीला (Tata Nexon EV) मोठी मागणी आहे.
Mahindra XUV300 Electric eKUV100 XUV400 EV Launch Soon: भारतात टाटाच्या आज सर्वाधिक इलेक्ट्रीक कार उपलब्ध आहेत. मारुतीला अद्याप एकही इलेक्ट्रीक कार लाँच करण्यास जमलेले नाही. तर महिंद्रा, एमजीकडे एक कार आहे. असे असताना आता महिंद्रा येत्या काळात आणखी दोन कार इलेक्ट्रीकमध्ये लाँच करणार आहे. यामुळे टाटा आणि महिंद्रामध्ये स्पर्धा रंगणार आहे.
देशात येत्या काळात इलेक्ट्रीक कारची मोठी मागणी वाढणार आहे. सध्या टाटा नेक्सॉन ईव्हीला (Tata Nexon EV) मोठी मागणी आहे. यामुळे या बाजारात पाय रोवण्यासाठी महिंद्रादेखील प्रयत्न करत आहे. महिंद्रा दोन जबरदस्त इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच करणार आहे. याची किंमतदेखील परवडणारी असण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत. (Mahindra Upcoming Electric Car Launch)
महिंद्राने सांगितले की, येत्या 3-4 वर्षांत आम्ही कमीत कमी 8 इलेक्ट्रीक कार लाँच करणार आहोत. यामध्ये कंपनीची एक्सयुव्ही 300 (Mahindra XUV300), एक्सयुव्ही 700 (Mahindra XUV700), छोटी एसयुव्ही महिंद्रा केयुव्ही 100 (Mahindra KUV100) आदी इलेक्ट्रीक व्हेरिअंटमध्ये येणार आहेत. आता लेटेस्ट रिपोर्टनुसार महिंद्रा Mahindra XUV400 Electric देखील लवकरच लाँच करणार आहे.
महिंद्राची अपकिमिंग इलेक्ट्रीक कार eXUV300 ला सर्वात आधी 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आले होते. ही कार MESMA प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केले जाणार होते. ही कार 350V पावरट्रेन ने लेस असणार होती. eXUV300 ची टक्कर टाटाच्या नेक्सॉनशी होणार आहे. पुढील वर्षी महिंद्रा ईकेयूवी100 ही सर्वात स्वस्त ईव्ही कार लाँच करणार आहे. या सर्व कारमध्ये महिंद्रा बॅटरी रेंजची देखील विशेष काळजी घेणार आहे. कारण लोकांना चांगला पर्याय मिळू शकेल.