खुशखबर! तरुणाईची धडकन Yamaha RX100 पुन्हा होऊ शकते लॉन्च, समोर आली कंपनीची प्लॅनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 04:57 PM2022-08-19T16:57:16+5:302022-08-19T16:58:32+5:30
Yamaha RX100 May Launch Soon: या दुचाकीचे प्रोडक्शन 1985 मध्ये सुरू झाले होते आणि 1996 मध्ये बंद झाले. मात्र, आता कंपनी पुन्हा एकदा ही दुचाकी लॉन्च करण्याची शक्यता आहे.
भारतातील सर्वात यशस्वी दुचाकींसंदर्भात बोलायचे झाल्यास, यामाहा आरएक्स-100 चे नाव येणार नाही, असे होऊच शकत नाही. यामाहा आरएक्स100 एक अशी बाईक होती, जिने मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या मनावर राज्य केले. यामाहा आरएक्स-100 ही भारतात सर्वाधिक लोकप्रियता मिळालेल्या दुचाकींपैकी एक आहे.
या दुचाकीचे प्रोडक्शन 1985 मध्ये सुरू झाले होते आणि 1996 मध्ये बंद झाले. मात्र, आता कंपनी पुन्हा एकदा ही दुचाकी लॉन्च करण्याची शक्यता आहे. नुकतेच बिझनेसलाईनला दिलेल्या एका मुलाखतीत यामाहा इंडियाचे अध्यक्ष ईशिन चिहाना यांनी म्हटले होते, की अद्याप यामाहाने कुठल्याही दुसऱ्या प्रोडक्टवर RX100 नाव वापरलेले नाही, कारण भविष्यात हिच्यासंदर्भात कंपनीचे प्लॅनिंग आहे.
त्यांच्या याच वक्तव्यावरून कंपनी RX100 पुन्हा लॉन्च करू शकते असा कयास लावला जाऊ शकतो. मात्र, कंपनी जुनीच Yamaha RX100 नव्याने लॉन्च करू शकत नाही. काहण त्या दुचाकीत टू-स्ट्रोक इंजिन होते, जे कधीही BS6 उत्सर्जन मानदंडांसोबत मॅच होऊ शकत नाही. यामुळे हिच्या इंजिनमध्ये बदल केल्यानंतरच ती लॉन्च केली जाऊ शकते. जर कंपनीने RX100 पुन्हा लॉन्च केली तर, तिचे डिझाईन देखील अपडेट केले जाईल.
मात्र, RX100 सध्या लॉन्च केली जाणार नाही. हिच्यासाठी लोकांना आणखी बरीच वाट पाहावी लागणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यामाह RX100 पुन्हा आणण्याचे ठरवले तरी ती 2025 च्या आधी येऊ शकत नाही. पण कंपनी 2026 साठी हिच्या संदर्भात योजना तयार करू शकते. यावर कंपनीला बरेच कामही करावे लागेल.