दिवाळीत 'या' 10 कारवर मिळतोय शानदार डिस्काउंट; 50000 रुपयांहून अधिक किमतीच्या ऑफर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 07:35 PM2022-10-10T19:35:05+5:302022-10-10T19:41:13+5:30
Diwali discount offers on cars : कॅश डिस्काउंटपासून एक्सचेंज बोनस, अॅक्सेसरीज बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा समावेश आहे.
नवी दिल्ली : तुम्हाला या दिवाळीत नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते, कारण अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या कारवर ऑफर्स देत आहेत. आम्ही तुमच्यासाठी 10 कारची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. या कारवर 30 हजार रुपयांहून अधिक ऑफर्स आहेत. दरम्यान, यामध्ये कॅश डिस्काउंटपासून एक्सचेंज बोनस, अॅक्सेसरीज बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा समावेश आहे.
1- मारुती अल्टो K10 वर 39,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर केला जात आहेत. या कारची किंमत 3.99 लाख ते 5.83 लाख रुपये आहे.
2- Renault Kwid वर 35,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहेत. त्याची किंमत 4.64 लाख ते 5.99 लाख रुपये आहे.
3- मारुती सेलेरियोवर 59,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. त्याची किंमत 5.25 लाख ते 7 लाख रुपये आहे.
4- मारुती वॅगनआरवर 40,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. या हॅचबॅक कारची किंमत 5.48 लाख ते 7.08 लाख रुपये आहे.
5- मारुती स्विफ्टवर 50,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. त्यावर 30,000 रुपयांचा कॅश डिस्काउंटही आहे. कारची किंमत 5.92 लाख ते 8.71 लाख रुपये आहे.
6- Hyundai Grand i10 Nios आणि Aura या दोन्हींवर 33,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. Grand i10 Nios ची किंमत 5.43 लाख ते 8.45 लाख रुपये आणि Aura ची किंमत 6.09 लाख ते 8.87 लाख रुपये आहे.
7- या महिन्यात मारुती इग्निसवर 30,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. 10,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट देखील मिळत आहे. कारची किंमत 5.35 लाख ते 7.72 लाख रुपये आहे.
8 - तुम्ही Renault Triber वर 50,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या MPV ची किंमत 5.92 लाख ते 8.51 लाख रुपये आहे.
9- होंडा सिटीवर या महिन्यात 37,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट ऑफर्स आहेत. होंडा सिटी कारची किंमत 11.57 लाख ते 15.52 लाख रुपये आहे.
10 - टाटा हॅरियर आणि सफारी या दोन्हींवर 45,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहेत. हॅरियरची किंमत 14.70 लाख ते 22.20 लाख रुपये आणि सफारीची किंमत 15.35 लाख ते 23.56 लाख रुपये आहे.