Raft Motors: रोजगाराची मोठी संधी! 99 रुपयांत इलेक्ट्रीक वाहन दुरुस्तीचे ट्रेनिंग मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:23 PM2021-10-05T20:23:13+5:302021-10-05T20:26:40+5:30
electric vehicle repair training: एकीकडे एक दार बंद झाले की दुसरे खुले होते, फक्त तशी नजर लागते म्हणतात. तशीच एक नवी रोजगाराची संधी चालून आली आहे.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे उद्योग जगताला मोठा हादरा बसला आहे. नुकसान झाल्याने आणि काम नसल्याने अनेकांना कंपन्यांनी नोकरीवरून कमी केले आहे. एकीकडे एक दार बंद झाले की दुसरे खुले होते, फक्त तशी नजर लागते म्हणतात. तशीच एक नवी रोजगाराची संधी चालून आली आहे. (Raft Motors offers electric vehicle repair training for Rs 99.)
कोरोना काळामुळे आणि इंधन दरवाढीमुळे लोकांचा ओढा इलेक्ट्रीक वाहनांकडे अधिक आहे. टाटा, ओला सारख्या कंपन्यांच्या विजेवर चालणाऱ्या वाहनांना मोठी मागणी आहे. याचबरोबर अन्य कंपन्यांच्या स्कूटरला देखील मोठी मागणी आहे. परंतू त्यांचे नाव एवढे प्रसिद्ध नसल्याने त्या प्रसिद्धीच्या झोतापासून मागे पडल्या आहेत. फोर्ड इंडियाच्या कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी देणारी कंपनी राफ्ट मोटर्स त्यापैकीच एक आहे. या कंपनीने फोर्डच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता ही कंपनी 99 रुपयांच इलेक्ट्रीक वाहन दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊन अनेकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे.
मुंबईतील ही वाहन निर्माता कंपनी Raft Motors केवळ 99 रुपयांत पाच दिवसांचे ट्रेनिंग देणार आहे. यामध्ये मोटर रिपेअरिंग, बॅटरी चार्जर रिपेअरिंग, पार्टस् असेंबलिंग, चार्जिंग स्टेशन जोडणी आदी कामे शिकविणार आहे. याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाणार आहे. यानंतर हे ट्रेनिंग घेतलेला व्यक्ती आपल्या शहरात, गावात गॅरेज उघडू शकणार आहेत. तसेच या उद्योगात अन्य व्यवसायाचे पर्यायही मिळणार आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा 1800 210 3888 वर कॉल करून माहिती मिळविता येणार आहे.
राफ्ट मोटर्सने भारतातील सर्वात जास्त रेंजच्या स्कूटरची घोषणा केली आहे. Indus NX (इंडस एनएक्स) ही स्कूटर 480 किमीची रेंज देणार आहे. या स्कूटरची किंमत 1,18,500 रुपयांपासून 2,57,431 रुपये असणार आहे. लवकरच ही कंपनी 1600 किमी रेंज देणारी कार आणणार आहे.