चार नव्या Electric Scooters एकत्र झाल्या लाँच; किंमत ६० हजारांपासून, पाहा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 08:10 PM2021-11-24T20:10:48+5:302021-11-24T20:11:07+5:30

Electric Vehicles : ग्रेटा इलेक्ट्रीकनं भारतीय बाजारपेठेत लाँच केल्या चार इलेक्ट्रीक स्कूटर्स

greta electric scooters launched four new scooters price starts from rs 60000 know features | चार नव्या Electric Scooters एकत्र झाल्या लाँच; किंमत ६० हजारांपासून, पाहा फीचर्स

चार नव्या Electric Scooters एकत्र झाल्या लाँच; किंमत ६० हजारांपासून, पाहा फीचर्स

googlenewsNext

गुजरातमधील इलेक्ट्रिक वाहन कंपनी ग्रेटा इलेक्ट्रीकने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या चार इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. कंपनीच्या या स्कूटर्समध्ये Harper, Evespa, Glide आणि Harper ZX यांचा समावेश आहे. भारतात या इलेक्ट्रीक स्कूटर्सची किंमत ६० हजार ते ९२ हजार रुपयांदरम्यान आहे. या ई-स्कूटर्समध्ये आकर्षक एक्सटीरिअर कलर, डिझायनर कन्सोल आणि मोठी स्टोरेज स्पेस मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या स्कूटर्स ७० ते १०० किमीची रेंज देतात.

या सर्व इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये डेटाईम रनिंग लाईट, ईबीएस, रिव्हर्स मोड, ATA सिस्टम, स्मार्ट शिफ्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट आणि अँटी थेफ्ट अलार्म असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. रिंगल चार्जवर या स्कूटर्स १०० किमीपर्यंतच्या रेंजसह आरामदायक रायडिंगचा अनुभव देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या इलेक्ट्रीक स्कूटर्समध्ये 48V/60V लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी ई-स्कूटरसाठी बॅटरी पॅक निवडण्याचा पर्यायही देत ​​आहे. ग्रेटा इलेक्ट्रीक स्कूटरचा दावा आहे की इ-स्कूटर १०० टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे चार तासांचा कालावधी लागतो.

काय आहेत फीचर्स?
ग्रेटा हार्पर, इव्हेस्पा आणि हार्पर ZX मॉडेल्सना ड्रम डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत, तर ग्लाइडमध्ये ड्युअल डिस्क हायड्रॉलिक ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. या इ-स्कूटर 22 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. सर्व स्कूटरमध्ये वेगवेगळी बॉडी स्टाइल आणि युनिक कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, हार्पर आणि हार्पर ZX मध्ये फ्रंट ऍप्रन, शार्प बॉडी पॅनेल्स आणि स्लीक टर्न सिग्नल्ससह स्पोर्टी प्रोफाइल मिळते. दोघांमधील सर्वात मोठा फरक हा आहे की हार्परला ड्युअल हेडलॅम्प युनिट देण्यात आले आहे, तर हार्पर ZX ला सिंगल हेडलॅम्प मिळतो.

Evespa ही एक रेट्रो-स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर आहे, ती पेट्रोल इंजिन असलेल्या Vespa स्कूटरसारखी दिसते. ही स्कूटर क्लासिक फ्लॅट फ्रंट ऍप्रन, कर्व्ही बॉडी पॅनल्स, गोल हेडलॅम्प आणि राउंड रियर व्ह्यू मिररसह येतो. पुढच्या ऍप्रनवर टर्न सिग्नलही देण्यात आलेले आहेत.

Web Title: greta electric scooters launched four new scooters price starts from rs 60000 know features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.