Happy New Year 2023 : पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:14 PM2022-12-14T18:14:41+5:302022-12-14T18:15:52+5:30
Upcoming Electric Hatchback Car in 2023: एकट्या जानेवारी महिन्यातच 3 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात येणार आहेत.
भारतात इलेक्ट्रिक कारचे ऑप्शन्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बहुतांश कंपन्यांचे लक्ष सध्या स्वस्तातील इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यावर आहे. भारतीय बाजारात 10 लाख रुपयांपेक्षा स्वस्तातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये बराच स्कोप आहे. 2022 मध्ये बऱ्याच इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्या. यानंतर आता 2023 मध्येही अनेक नवीन मॉडेल्स बाजारात येत आहेत. जानेवारी महिन्यापासूनच याला सुरुवात होणार आहे. एकट्या जानेवारी महिन्यातच 3 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात येणार आहेत.
Tata Tiago EV -
टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्ही यापूर्वीच लॉन्च केली आहे. हिची डिलिव्हरी पुढील महिन्यात सुरू होईल. या इलेक्ट्रिक हॅचबॅकची किंमत 8.49 लाख रुपयांपासून ते 11.79 लाख रुपयांपर्यंत असेल. Tata Tiago EV ला दोन बॅटरी ऑप्शन्स आहेत. ही कार फूल चार्जमध्ये 315 किमीपर्यंत चालेल, असा दावा करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे या कारला आतापर्यंत 20 हजार बुकिंगदेखील मिळाले आहे.
MG Air EV -
एमजी आपली छोटू इलेक्ट्रिक कार MG Air EV देखील भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार ग्रेटर नोएडामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाऊ शकते. ही इंडोनेशियातील Wuling Air EV वर आधारित इलेक्ट्रिक कार असेल. हीची लांबी 2.9 मीटर आणि व्हीलबेस 2.01 मीटर एवढा असेल. या कारला ट्विन 10.25-इंचाचे स्क्रीन, 150 किमीची प्रत्यक्ष रेंज आणि 25 kWh बॅटरी पॅक मिळेल.
Citroen eC3 -
Citroen यावर्षी आपली कॉम्पॅक्ट हॅचबॅक C3 लॉन्च केली होती. आता भारतात हिचे इलेक्ट्रिक वर्जनही येत आहे. कंपनीने नुकतेच म्हटले आहे, की या स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कारचे नाव Citroen eC3 असे असेल. ही कार eCMP आर्किटेक्चरवर आधारित असेल. या कारची ड्रायव्हिंग रेन्ज जवळपास 300 किमी एवढी असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.