सखी स्कूटर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 08:54 PM2017-08-09T20:54:23+5:302017-08-09T20:54:28+5:30

स्कूटर हे सध्या सर्वांचे उपयुक्त असे दळणवळणाचे साधन झाले आहे. विशेष करून शहरी भागात व महिलांनाही वापरण्यास सुलभ असल्याने त्यात हेल्मेट ठेवण्यासाठी असणारी सोय हेच स्कूटरवाढीचे मुख्य कारण म्हणावे लागेल.

Happy scooter ... | सखी स्कूटर...

सखी स्कूटर...

Next

शहरी जीवनात दुचाकी, टु व्हीलर हे नित्याचे व गरजेचे उपयुक्त वाहन ठरले आहे. सायकलचा जमाना जाऊन स्कूटर व मोटारसायकल या दुचाकींचा जमाना आला, त्यालाही तसे म्हटले तर बराच काळ लोटला आहे. शहरी जीवनात ये-जा करण्यासाठी या दुचाकीने आपली उपयुक्तता केव्हाच सिद्ध केली आहे. त्यातही स्कूटरचा वापर हा आता गेल्या काही काळात मायलेज मोटारसायकल इतके नसूनही चांगला वाढला आहे. कॉलेजला कधी जातो व स्कूटरने कधी फिरतो, असे एक चित्र आज अनेकांच्या मनोत व कल्पनेत असते. महिलांनीही स्कूटरचा वापर सुरू केल्याने स्कूटरच्या खपामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रेमीजनांना एकत्र आणणारे, शहरातील वाहतूककोंडीतूनही सुखरूप व काहीसे लवकर सुटका करून देणारे स्कूटरसारखे वाहन म्हणजे सर्वांची सखी असल्यासारखी बाब आहे. अनेकजण स्कूटरवर इतका जीव जडवतात की स्वतःच्या टापटिप राहाण्यासारखे स्कूटरलाही ते राखत असतात. सध्याच्या स्कूटर्स या पूर्वीच्या मॅन्युएल गीयरसारख्या चालवायला कठीण नाहीत. त्यामुळेच त्यांचा वापर अगदी तरुणांपासून वृद्धाकडूनही व तरुणींपासून ते अगदी वयाच्या पन्नाशी ओलांडलेल्यांकडूनही होऊ शकतो. वजनाला हलकी, चालवायला सोपी, सस्पेंशन्स प्रभावी असल्याने आणि एकूणच सुटसुटीतपणाने वापरता येण्यासारखी स्कूटर सामान नेण्यासाठीही डिक्की, सीटखालील जागा देऊ करते. यामुळेच शहरामध्ये स्कूटर्सचा वापर वाढला आहे. महिला व तरुणींना वापरण्यासा व हाताळण्यास सोपी व हलकी असल्याने विविध कामांसाठी स्कूटर्स वापरल्या जाऊ लागल्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी, कार्यालयात-कॉलेजात जाण्यासाठी, शॉपिंगला जाण्यासाठी इतकेच नव्हे तर थोड्या फार प्रमाणात शहरापासून काहीसे लांब जाऊन छोटी सहल करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. यामुळेच मोटारसायकलच्या तुलनेत स्कूटर मायलेज कमी देत असूनही तिच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या रस्त्यावर वाहनसुख देणारी स्कूटर ही फक्त महिलांसाठी आहे, असा मतप्रवाह मध्यंतरी दिसत होता. पण तसे नाही. कारण आगळ्या वेगळ्या ढंगाच्या, रंगाच्या स्कूटरला आणि ताकदीनेही चांगल्या असणाऱ्या इंजिनाची सोबत आता ऑटोगीयर स्कूटरलाही मिळाली आहे. पूर्वी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्या स्कूटर्सची निर्मिती करीत होत्या, आता विविध कंपन्याच्या स्कूटर्स व त्यांच्या मॉडेल्सचा पर्याय उपलब्ध आहे. स्कूटर्सची हीच खासियत म्हणजे तिच्या लोकप्रियतेची झलक म्हणावी लागेल. लांब पल्ल्यासाठी जरी वापरता येण्यासार स्थिती नसली तरी शहरी जीवनातील सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहाण्याऐवजी लोकांना स्कूटर्सचा वापर करणेच अधिक सोयीचे झाले आहे. तशात हेल्मेट सक्तीचे झाल्याने ते ठेवण्याची सोय हा सर्वात प्लस पॉइंट असल्याने शहरी वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली तर नवल नाही.

Web Title: Happy scooter ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.