Harley-Davidson वर चौथ्यांदा बाईक माघारी बोलावण्याची वेळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:30 AM2018-10-30T11:30:47+5:302018-10-30T11:31:44+5:30
हार्ले डेव्हिडसन कंपनीने गेल्या आठवड्यात या बाईक मागे बोलवत असल्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : Harley-Davidson या धाकड बाईकच्या कंपनीने आपल्या 2.3 लाख बाईक माघारी बोलविल्या आहेत. क्लचमध्ये समस्या येत असल्याने हा निर्णय कंपनीने घेतला असून गेल्या पाच वर्षांत बाईक माघारी बोलावण्याची ही चौथी वेळ आहे.
हार्ले डेव्हिडसन या प्रिमिअम श्रेणीतील बाईक निर्मात्या कंपनीने 2017, 2018 मध्ये विकल्या गेलेल्या टुरंग, ट्राईक आणि सीव्हीओ टुरिंग ही मॉडेल्स आणि काही 2017 मधील काही सॉफ्टेल या बाईकची मॉडेल्स माघारी बोलावली आहेत.
हार्ले डेव्हिडसन कंपनीने गेल्या आठवड्यात या बाईक मागे बोलवत असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकतीच नवीन मॉडेल्सचीही घोषणा केली आहे. यामध्ये नवीन इलेक्ट्रीक मॉडेल्स आणि आशियासाठी कमी किंमतीच्या मॉडेल्सचा समावेश आहे. 2022 पर्यंत ही मॉडेल्स भारतीय बाजारात आणली जातील.
या पूर्वी कंपनीने 2016 मध्ये क्लचच्या समस्येमुळे 27,232 बाईक माघारी बोलाविल्या होत्या. तसेच 2015 मध्ये 45,901 बाईक आणि 2103 मध्ये 29,046 मॉडेल्स माघारी बोलाविल्या होत्या.