Harley-Davidson ची सर्वात स्वस्त बाईक Royal Enfield ला देणार टक्कर, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 01:16 PM2022-05-01T13:16:21+5:302022-05-01T13:16:52+5:30

या दुचाकीच्या फ्यूअल टँकवरील लोगोवरून स्पष्ट होते, की ही एक Harley-Davidson ची दुचाकी आहे, याशिवाय हिच्या मागच्या बाजूलाही HD500 असे लिहिलेले आहे.

Harley davidson reportedly working on its affordable motorcycle will rival royal enfield | Harley-Davidson ची सर्वात स्वस्त बाईक Royal Enfield ला देणार टक्कर, जाणून घ्या खासियत

Harley-Davidson ची सर्वात स्वस्त बाईक Royal Enfield ला देणार टक्कर, जाणून घ्या खासियत

googlenewsNext

Harley-Davidson ने भारतातील व्यापार बंद केला आहे. पण, देशातील आपले स्थान काय ठेवण्यासाठी कंपनीने Hero MotoCorp सोबत करार केला आहे. ही कंपनी आता देशात, महागड्या दुचाकींऐवजी एंट्री-लेव्हल बाइक्सवर काम करत आहे. काही वर्षांपूर्वी, हार्लेने (हार्ले-डेव्हिडसन) चिनची वाहन निर्माता कंपनी किआनजिंगसोबत भागीदारी केली आहे. यात, मिड-लेव्हल प्लॅटफॉर्म आणि इंजिन तयार करण्यासंदर्भात करार झाला आहे. चीनची ही कंपनी बेनेलीची पॅरेंट कंपनीदेखील आहे. नुकतीच, कंपनीची सर्वात स्वस्त बाइक Harley-Davidson 338R दिसून आली आहे.

500 CC ची बाईक -
Harley-Davidson 338R चा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ चीनच्या एका वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. यात दिसत असलेली दुचाकी 500 सीसीची नवी दुचाकी असू शकते. फोटो बघून आम्ही आपल्याला सांगू शकतो, की ही दुचाकी हार्ले-डेव्हिडसन रोडस्टरसारखी दिसते. या दुचाकीला गोल हेडलॅम्पसह सिल्व्हर बेझल आणि टियरड्रॉप आकाराचीचा फ्यूअल टँक देण्यात आला आहे.

बेनेली लिओनचीनो 500 चे इंजिन -
ही नवी दुचाकी गोल रीयर व्ह्यू मिररसह आली असून तिला लांब सिंगल-पीस सीटही देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, ही दुचाकी टेस्टिंगवेळी दिसणे, यावरून, हार्ले-डेव्हिडसनच ही तयार करत आहे, असे सिद्ध होत नाही. या दुचाकीच्या इंजिनसंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. मात्र, हिला 500 सीसीच्या पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाईल जे बेनेली लिओनचीनो 500 कडून घेतले जाईल, असा अंदाज आहे. या इंजिनला 6-स्पीड गियरबॉक्स आहे.

मागच्या बाजूला लिहिले आहे, HD500 -
या दुचाकीच्या फ्यूअल टँकवरील लोगोवरून स्पष्ट होते, की ही एक Harley-Davidson ची दुचाकी आहे, याशिवाय हिच्या मागच्या बाजूलाही HD500 असे लिहिलेले आहे. यावरूनही, ही Harley-Davidson ची 500 cc दुचाकी असू शकते, असा अंदाज लावला जाऊ शकतो.

Web Title: Harley davidson reportedly working on its affordable motorcycle will rival royal enfield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.