पेट्रोल-डिझेल शिवाय चालणार Harley-Davidson च्या नव्या बाइक्स, डिझाइनचं केलं जातंय कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 01:35 PM2019-01-10T13:35:04+5:302019-01-10T13:44:30+5:30
लास वेगास इथे सुरु असलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे एकापेक्षा एक आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित प्रॉडक्ट सादर करत आहेत.
लास वेगास इथे सुरु असलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे एकापेक्षा एक आधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित प्रॉडक्ट सादर करत आहेत. यात प्रसिद्ध बाइक कंपनी Harley-Davidson सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. Harley-Davidson ने या शोमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक मोपेड कॉन्सेप्ट सादर केले. भविष्यात Harley-Davidson हे दोन्ही मॉडेल लॉन्च करणार याकडे पाऊल मानलं जात आहे. या दोनमधील एक बाइक इलेक्ट्रिक स्कूटर आहे तर एक इलेक्ट्रिक टू-व्हीलर.
गेल्यावर्षी Harley-Davidson कडून जाहीर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या स्केचेससोबत हे दोन्ही मॉडेल फार मिळते-जुळते आहेत. आणि दोन्हीही मॉडेल इलेक्ट्रिक मोटर सोबतच येणार आहे. Harley-Davidson च्या या दोन्ही मॉडेलची CES 2019 मध्ये चांगलीच प्रशंसा केली गेली.
इतकेच नाही तर या शोमध्ये आलेले प्रेक्षक ही दोन्ही डिझाइन पाहून चांगलेच हैराण झालेत. सध्यातरी कंपनीकडून या दोन्ही टू-व्हीलरची झास्त माहिती समोर आली नाही. मोपेडबाबत सांगायचं तर Harley-Davidson ची ही स्कूटर रनिंग बोर्डवर तयार करण्यात आल्यासारखं वाटतं. स्कूटरची सिंगल पीस सीट बॅटरीच्या वरच्या बाजूला लावण्यात आली आहे.
Harley-Davidson ने जर या दोन्ही वाहनांचं प्रॉडक्शन सुरु केलं तर सर्वातआधी यूएसच्या बाजारात लॉन्च करतील. कंपनीचं हे पाऊल इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे टाकलेलं चांगलं पाऊल आहे. सोबतच साऊथ इस्टमध्ये अशा बाइकचं चलनही फार वाढलं आहे. त्यामुळे अर्थातच याला मागणीही वाढेल.
Harley-Davidson LiveWire ही बाइक एकदा चार्ज केल्यानंतर १७७ किलोमीटर पर्यंतचा प्रवास करु शकते. या बाइकला ० ते १०० किमीची स्पीड पकडण्यासाठी ३.६ सेकंदाचा वेळ लागतो. अमेरिकेत या बाइकची स्पर्धा Zero SR या बाइकसोबत असेल. SR ही बाइक एकदा चार्ज केल्यावर १९३ किमी पर्यंतचं अंतर पार करु शकते. या बाइकमध्ये १४.४ केडब्ल्यूची मोटर लावण्यात आली आहे. कंपनीने या बाइकची किंमत २९, ७९९ डॉलर (21 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे.