तुमच्या डोक्याला सुरक्षित ठेवणारे कारमधील हेडरेस्ट महत्त्वाचेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 02:43 PM2017-09-05T14:43:08+5:302017-09-05T14:47:07+5:30

कार उत्पादक सध्या वेगवेगळ्या प्रकारची हेडरेस्ट कारमध्ये आणत आहेत. पूर्वीच्या फियाट व अॅम्बेसेडरमध्ये हेडरेस्ट हा प्रकारच नव्हता. काही लोक ते स्वतंत्रपणे लावत होते.कालांतराने हेडरेस्टची गरज व उपयुक्तता निदर्शनास आली व हेडरेस्ट आज सर्वच कारमध्ये दिसू लागले

The Headrest is the key to protecting your head | तुमच्या डोक्याला सुरक्षित ठेवणारे कारमधील हेडरेस्ट महत्त्वाचेच

तुमच्या डोक्याला सुरक्षित ठेवणारे कारमधील हेडरेस्ट महत्त्वाचेच

googlenewsNext
ठळक मुद्देकार चालकाप्रमाणेच प्रवाशांनाही हेडरेस्ट हे अतिशय उपयुक्त व सुरक्षित साधन आहे.अपघाताच्यावेळी चालकाचे डोके मागे हेडरेस्टवर येते व मानेला झटका कमी बसतो.तुमच्या डोक्याला लागणाऱ्या माराला त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावरले जाते.

कार उत्पादक सध्या वेगवेगळ्या प्रकारची हेडरेस्ट कारमध्ये आणत आहेत. पूर्वीच्या फियाट व अॅम्बेसेडरमध्ये हेडरेस्ट हा प्रकारच नव्हता. काही लोक ते स्वतंत्रपणे लावत होते.कालांतराने हेडरेस्टची गरज व उपयुक्तता निदर्शनास आली व हेडरेस्ट आज सर्वच कारमध्ये दिसू लागले आहे. काही काळापूर्वी हेडरेस्ट हे दोन स्टील रॉड असणारे होते. आजही काही मोटारींमध्ये त्या प्रकारचे हेडरेस्ट लावले जाते. त्याचप्रमाणे सीटमध्येच अंतर्भूत असणारे हेडरेस्टही आता प्रामुख्याने दिसू लागले आहे. काही मोटार उत्पादक या दोन प्रकारच्या हेडरेस्टची सुविधा देताना त्यामध्ये अतिरिक्त किंमत घेतात किंवा त्यांच्या मोटारींच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या हेडरेस्टची पद्धत देऊ करतात. पण हेडरेस्ट आता सर्वच कारमध्ये दिसू लागले आहे.

कार चालकाप्रमाणेच प्रवाशांनाही हेडरेस्ट हे अतिशय उपयुक्त व सुरक्षित साधन आहे. प्रवासामध्ये अचानकपणे ब्रेक दाबला गेल्यानंतर प्रवाशांचे डोदे हे पुढे झटकन येते व लगेच ते मागे आदळते. त्यावेळी किंवा मागे डोके टेकून आराम करताना हेडरेस्ट हे अतिशय आरामदायी ठरत असते. 
अकस्मात ब्रेक लागल्यानंतर तुम्ही झटदिशी पुढे जात व तुमचे डोके पुढ्या सीटवर वा डॅशबोर्डवर आपटण्याची शक्यता असते. अशावेळी सीटबेल्टतुम्हाला रोखून धरतो. काही क्षणात तुम्ही पूर्ववत मागे येता त्यासाठी हेडरेस्ट असल्याने तुमच्या डोक्याला मागच्याबाजून आदळले जाताना हेडरेस्टचा वापर होतो.

अपघाताच्यावेळी काही प्रकारांमध्ये अशीच क्रिया घडते व तुमचे डोके मागच्या बाजून आदळले जाते, त्यावेळी तुमच्या डोक्याचे संरक्षण होत असते. विशेष करून चालकाच्या आसनावर असणाऱ्या हेडरेस्टमुळे अशी क्रिया जेव्हा अपघाताच्यावेळी घडते तेव्हा चालकाचे डोके मागे हेडरेस्टवर येते. मानेला झटका कमी बसतो, मागील भाग आदळून तुमच्या डोक्याला लागणाऱ्या माराला त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावरले जाते. यामुळेच हेडरेस्टचा हा वापर वा उपयोग अतिशय मोलाचा असतो.

हेडरेस्टच्या जुन्या प्रकारामध्ये असलेल्या स्टील रॉडमुळे हेडरेस्ट तुम्हाला कमी अधिक हवे तसे खाली वर करून उंचीप्रमाणे अॅडजेस्ट करता येते. तसेच कधी काचा उघडडल्या गेल्या नाहीत, तर त्यामुळे कारमध्ये अडकून पडण्याची शक्यता असते. अशावेळी तातडीने कारमधून बाहेर पडणे वा बाहेरील हवा आत येणे यासाठी काच फोडणे गरजेचे होते. हाताला काही मिळत नाही, अशावेळी हेडरेस्ट काढून त्याचा स्टील रॉड काचेवर मारू काच फोडता येते, जेणे करून तातडीच्या वा आणीबाणीच्या काळात ते तुम्हाला अशा पद्धतीनेही उपयुक्त ठरत असते.

Web Title: The Headrest is the key to protecting your head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.