Tubeless Tyres आणि Tube Tyres मध्ये हे आहेत मोठे फरक, पाहा याचे फायदे-तोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 04:02 PM2023-05-26T16:02:59+5:302023-05-26T16:04:41+5:30

तुम्ही वाहन वापरत असाल तर तुम्ही ट्युबलेस आणि ट्युब टायर्स असे प्रकार ऐकले असतील. परंतु ट्युबलेस की ट्युब टायर चांगलं याबाबत कधीतरी तुमच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल.

Here are the major differences between Tubeless Tires and Tube Tires see their pros and cons | Tubeless Tyres आणि Tube Tyres मध्ये हे आहेत मोठे फरक, पाहा याचे फायदे-तोटे

Tubeless Tyres आणि Tube Tyres मध्ये हे आहेत मोठे फरक, पाहा याचे फायदे-तोटे

googlenewsNext

तुम्ही वाहन वापरत असाल तर तुम्ही ट्युबलेस आणि ट्युब टायर्स असे प्रकार ऐकले असतील. परंतु ट्युबलेस की ट्युब टायर चांगलं याबाबत कधीतरी तुमच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल. हा प्रकार अनेकदा त्या त्या वाहनावर अवलंबून असतो. परंतु याशिया ट्युबलेस टायर्स आणि ट्युब टायर्स याचे आपापले फायदेही आहेत. पाहूया या दोन्ही मध्ये काय आहे फरक.

ट्युबलेस टायर्स

गेल्या काही वर्षांमध्ये ट्युबलेस टायर्सची लोकप्रियता वाढली आहे. ट्युबलेस टायर्सचे अनेक फायदेही आहेत. पंक्चर जरी झालं तरी तुम्ही काही अंतर पार करू शकता. नावावरूनच समजलंच असेल त्याप्रमाणे यामध्ये ट्युब नसते. टायरमध्ये भरलेली हवा त्यातच रोखून धरण्यासाठी यात कोणतीही ट्युब नसते, पण रिम आणि टायरच्या मध्ये एअरटाईट असते. यामुळे हवा बाहेर जाण्यापासून रोखली जाते.

ट्युबलेस टायर्समुळे उत्तम हँडलिंग आणि स्टेबिलिटी मिळते. यात इनर ट्युब नसल्यानं टायरच्या साईड व्हॉल्व रिजिड करण्यात येतात. यामध्ये कॉर्नरिंग ग्रिपही चांगली मिळते आणि अधिक रिस्पॉन्सिव्ह एक्सपिरिअन्स मिळतो. यामध्ये रोलिंग रेझिस्टन्सही कमी असतो, यामुळे मायलेजही अधिक मिळण्यास मदत होते. नुकसान सांगायचं झालं तर ट्युब टायर्सपेक्षा यांची किंमत तुलनेने अधिक असते आणि डिझाईन केलेल्या रिम्सवरच फिट होतात.

ट्युब टायर्स

ट्यूब टायर दीर्घकाळापासून वापरात आहेत. नावाप्रमाणेच या टायर्समध्ये ट्यूब असते. ट्यूब टायरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ट्युबलेस टायर्सच्या तुलनेत ते स्वस्त आहेत. हे सामान्यतः ट्यूबलेस टायर्सचं उत्पादन तुलनेनं स्वस्त असतं. दरम्यान, हे टायर्स पंक्चर झाले, तर अशा स्थितीत तुमचं वाहन फार काळ चालू शकत नाही.

पंक्चर झाल्याच्या स्थितीत या टायर्सच्या इंटरनल ट्युबला बदलून किंवा ती नीट करून तुम्ही वापरू शकता. यासाठी तुम्हाला तुलनेनं खर्चही कमी येतो.

Web Title: Here are the major differences between Tubeless Tires and Tube Tires see their pros and cons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.