येतेय Maruti Ertiga सारखी दिसणारी, फीचर्स असलेली Toyota Rumion; पाहा काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:52 PM2023-01-22T16:52:48+5:302023-01-22T16:53:18+5:30

येत्या काळात भारतात एक नवीन 7 सीटर कार लाँच होणार आहे, जी सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारीत सादर केली जाऊ शकते आणि तिचे नाव टोयोटा रुमियन असेल.

Here comes the Maruti Ertiga like Toyota Rumion with features See what s special | येतेय Maruti Ertiga सारखी दिसणारी, फीचर्स असलेली Toyota Rumion; पाहा काय आहे खास?

येतेय Maruti Ertiga सारखी दिसणारी, फीचर्स असलेली Toyota Rumion; पाहा काय आहे खास?

googlenewsNext

भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या 7 सीटर कारला चांगली मागणी असताना टोयोटा आगामी काळात नवीन 7 सीटर कार आणण्याच्या तयारीत आहे. या कारचे नाव टोयोटा रुमियन असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार मारुती सुझुकी अर्टिगाची री-बॅज्ड केलेलं व्हर्जन असेल, जी लुक आणि फीचर्समध्ये अर्टिगासारखीच असेल, परंतु ती अधिक पॉवरफुल असू शकते. सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारीत रुमियन सादर केली जाऊ शकते. जर तुम्हीही स्वत:साठी नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर प्रथम जाणून घ्या की या MPV मध्ये काय पाहायला मिळेल?

Toyota Rumion MPV च्या लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचे तर मारुती अर्टिगाच्या तुलनेत काही कॉस्मेटिक बदल केले जातील. Rumion ला री-डिझाइन केलेले ग्रिल, पॉवरफुल बंपर, टोयोटा बॅजिंग, बूडन ट्रिम आणि ब्लॅक इंटिरियर पाहायला मिळेल.

काय असतील फीचर्स ?
टोयोटा रुमियनमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल्स, रीअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, पार्किंग कॅमेरा आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह आणखीही फीचर्स दिसून येतील.


इंजिन आणि पॉवर

टोयोटाच्या आगामी 7 सीटर कार रुमियनच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 105 पीएस पॉवर आणि 138 एनएम पिकअप टॉर्क जनरेट करते. या MPV मध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिसेल. याची संभाव्य किंमत 10 लाखांपासून पुढे असू शकते. 

Web Title: Here comes the Maruti Ertiga like Toyota Rumion with features See what s special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.