ही आहे कार स्टीयरिंग पकडण्याची योग्य पद्धत; अर्धं जग चुकतं! तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 07:01 PM2023-11-24T19:01:27+5:302023-11-24T19:02:24+5:30
जाणून घ्या, कार स्टीयरिंग योग्य पद्धतीने पकडण्याच्या टिप्स...
जेव्हा आपण कार अथवा एखाधे वाहन चालवतो, तेव्हा त्या वाहनाचे स्टीयरिंग योग्य पद्धतीने पकडणे अत्यंत महत्वाचे असते. कारण योग्य पद्धतीने स्टीयरिंग पकडल्यास ड्रायव्हिंग सुरक्षित होते. यामुळे आपले वाहनही योग्य प्रकारे कंट्रोल होऊ शकते. खरे तर कारचे स्टीयरिंग कशा पद्धतीने पकडावे याचे काही नियम नाहीत. मात्र, आपले दोन्ही हात स्टीयरिंगवर 9 आणि 3 वाजताच्या पोझिशनमध्ये असल्यास कारवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रित करता येते, असे मानले जाते.
असे गृहित धरा की, कारचे स्टीयरिंग घड्याळ आहे. आता घड्याळात ज्या ठिकाणी 9 वाजलेले असतात, तेथे स्टीयरिंगवर डावा हात ठेवा आणि जेथे 3 वाजतात, तेथे उजवा हात ठेवा. अशा पद्धतीने स्टीयरिंग पकडल्यास चांगला कंट्रोल मिळतो. या पोझिशनमध्ये आपल्याला कार अधिक चांगल्या पद्धतीने वळवता येते आणि मनगटावर अधिक जोर पडत नाही.
कार स्टीयरिंग योग्य पद्धतीने पकडण्याच्या टिप्स -
- नेहमी दोन्ही हाताने स्टीयरिंग पकडा -
- दोन्ही हात घड्याळातील 9 आणि 3 वाजताच्या स्थितीत ठेवा -
- स्टीयरिंग घट्ट पकडू नका, मात्र सैलही सोडू नका.
- स्टीयरिंग विनाकारण फिरवू नका.
- जर आपण वेगाने वळत असाल, तर दोन्ही हातांनी स्टीयरिंग व्हील घट्ट पकडा.