Hero ची सर्वात स्वस्त Electric Scooter; किंमत ४७ हजारांपेक्षाही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 04:00 PM2021-10-17T16:00:37+5:302021-10-17T16:01:14+5:30
Hero Electric Scooter : पाहा काय आहे विशेष आणि कोणते आहेत फीचर्स.
Hero Electric Scooter : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel) विक्रमी पातळीवर आहेत. त्यामुळे आता लोकं अन्य पर्यायांकडे वळू लागले असून इलेक्ट्रीक दुचाकींची मागणी वाढत आहे. प्रामुख्यानं स्कूटर्सना ग्राहकांची पसंती मिळत आहे. याच कारणामुळे कंपन्या सातत्यानं नवनव्या इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करत आहेत. बाजारात ग्राहकांसाठी अनेक परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला दिग्गज दुचाकी कंपनी Hero च्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईकबद्दल सांगत आहोत. या स्कूटरचं नाव Hero Electric Flash LX (VRLA) असं आहे.
Hero Electric Flash LX (VRLA) ची किंमत 46,640 रूपये एक्स शोरूम इतकी आहे. ही स्कूटर रेड आणि सिल्व्हर या दोन कलर ऑप्शनमध्ये मिळते. यात पुढील बाजूला LED हेडलँप्स देण्यात आलेले आहेत. ते या स्कूटरला अधिक स्टायलिस्ट बनवतात. तसंच यात मागे सामान ठेवण्यासाठी कॅरिअरही देण्यात आलं आहे.
स्कूटरमध्ये 48V बॅटरी पॅक देण्यात आलं आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 किमीपर्यंत जाऊ शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास इतका आहे. त्यामुळे ही स्कूटर चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सची आवश्यकता भासत नाही. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तासांचा कालावधी लागतो.
काय आहेत फीचर्स?
स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला स्पीड ते बॅटरी लेव्हल सारखी माहिती मिळते. स्कूटरमध्ये 12-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे स्कूटर स्टाईलिश आणि वजनाने हलकी होते. विशेष गोष्ट अशी की जर तुमच्या फोनची बॅटरी कमी असेल तर स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे, याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल चार्जगी करू शकता.