Ather, Hero Electric Scooter fire : ओलाचं काय घेऊन बसलात, हीरो-एथरच्याही इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:35 PM2022-05-28T15:35:11+5:302022-05-28T15:40:01+5:30

कंपनीनं आग लागण्यामागचं कारण सांगितलेलं नसलं, तरी नेटकऱ्यांनी मात्र कंपनीची शाळा घेतली. 

hero electric ather electric scooter showroom minor fire in chennai ola pure ev memes viral | Ather, Hero Electric Scooter fire : ओलाचं काय घेऊन बसलात, हीरो-एथरच्याही इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्या

Ather, Hero Electric Scooter fire : ओलाचं काय घेऊन बसलात, हीरो-एथरच्याही इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्या

googlenewsNext

ओला (Ola) आणि ओकिनावा (Okinawa) सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर्सना आग लागण्याच्या घटनांनंतर आता एथर एनर्जीच्या डीलरशिपवरही (Ather Energy) आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, ही आग छोटी असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. तर दुसरीकडे २५ मे रोजी ओडिशामध्ये Hero Photon EV या स्कूटरलाही आग लागल्याची घटना घडली आहे.

तुम्ही दुसऱ्यांचं ऐकण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगतो ती चेन्नईच्या शोरुमध्ये आगीची एक छोटी घटना घडली आहे. आमच्या काही मालमत्तेचं आणि स्कूटरचं नुकसान झालंय. सुदैवानं आमचे कर्मचारी सुरक्षित आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. हे सेंटर त्वरितच पुन्हा खुलं केलं जाईल, असं ट्वीट एथर एनर्जीनं केलं.

दरम्यान, ही आग कशी लागली याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही किंवा कंपनीचे को-फाऊंडर तरूण मेहता यांनी याबाबत काही अपडेटही दिलं नाही. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. परंतु यात काही स्कूटर्स जळून खाक झाल्या.




सोशल मीडियावर मीम्स
एथर एनर्जीनं भलेही या आगीमागचं मुख्य कारण सांगितलं नसलं तरी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत कंपनीची शाळा घेतली. तर काही लोकांनी शोरूममध्ये आग लागण्याच्या कारणावरही संशय व्यक्त केला. सोशल मीडियावर याचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.





हीरोच्या स्कूटरलाही आग
या आगीच्या घटनांमध्ये आता Hero Electric च्या इलेक्ट्रीक स्कूटरलाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार कथिरतरित्या ही आग स्कूटर चार्जिंगला असताना लागल्याचं सांगण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार याचं कारण शॉर्ट सर्किट मानलं जात आहे. या ठिकाणी इलेक्ट्रीक स्कूटर रात्रभर चार्जिंगला लावण्यात आली होती. दरम्यान, यावर कंपनीनं स्पष्टीकरण देत एसी फेज आणि घरातील तारांचा संपर्क झाल्याचं संभाव्य कारण असल्याचं कंपनीनं म्हटलं. शॉर्ट सर्किट आणि  खराब फ्युजमुळे हे शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगण्यात आलं.

Web Title: hero electric ather electric scooter showroom minor fire in chennai ola pure ev memes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.