सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:50 PM2022-12-13T20:50:03+5:302022-12-13T20:50:30+5:30

Hero Electric Optima : हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे.

Hero Electric Optima Gives 140 Km Range In Single Charge Know Price And Features | सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स...

सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स...

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. दरम्यान, आज आपण हिरो इलेक्ट्रिकच्या (Hero Electric) लोकप्रिय स्कूटर हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा (Hero Electric Optima) बद्दल बोलत आहोत. या स्कूटरला किंमती व्यतिरिक्त रेंज आणि कमी वजनामुळे पसंती दिली जाते. जर तुम्हाला हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा आवडत असेल किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी या स्कूटरच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या...

Hero Electric Optima Variants and Price
हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. ज्यामध्ये पहिला व्हेरिएंट सीएक्स (CX) आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 67,190 रुपये आहे. दुसरा व्हेरिएंट म्हणजे ड्युअल बॅटरी पॅक असलेला सीक्स ईआर (CX ER) आहे. ज्याची किंमत 85,190 रुपयांपर्यंत आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम, दिल्ली येथील आहेत.

Hero Electric Optima CX Motor
हिरो इलेक्ट्रिकने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 51.2V, 30Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये 550W पॉवरची BLDC मोटर जोडण्यात आली आहे. ही मोटर 1.2 kW चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 4 ते 5 तासात फूल चार्ज होते.

Hero Electric Optima CX Range and Top Speed
रेंज आणि स्पीडबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यावर सिंगल बॅटरी व्हेरिएंटमध्ये 82 किमी आणि डबल बॅटरी व्हेरिएंटमध्ये 10 किमीची रेंज देते. या रेंजसोबतच टॉप स्पीड 20 किमी प्रतितास आहे.

Hero Electric Optima CX Features
हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमाच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, क्रूझ कंट्रोल, वॉक असिस्ट फंक्शन, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, रिमोट लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी हेड लाईट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Hero Electric Optima CX Suspension and Brakes
हिरो ऑप्टिमाच्या फ्रंटमध्ये टेलीस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि रिअरमध्ये ड्युअल शॉक एब्जॉर्बर सिस्टम बसवण्यात आली आहे. ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम मिळत आहे. स्कूटरला 12-इंच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

Hero Electric Optima CX Rivals
इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजमध्ये हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमाची स्पर्धा Bounce Infinity E1, BGauss A2 आणि Ampere Magnus सोबत होऊ शकते.

Web Title: Hero Electric Optima Gives 140 Km Range In Single Charge Know Price And Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.