आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric टू-व्हीलर; कंपनीकडून कर्जाची सुविधा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 12:55 PM2022-02-04T12:55:03+5:302022-02-04T12:55:58+5:30

Hero Electric : देशभरातील हिरो इलेक्ट्रिकच्या 750 डीलरशिप्सकडून ग्राहक टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. 

Hero Electric partnered with axis bank for hassel free ownership experience | आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric टू-व्हीलर; कंपनीकडून कर्जाची सुविधा उपलब्ध

आता कोणत्याही त्रासाशिवाय खरेदी करा Hero Electric टू-व्हीलर; कंपनीकडून कर्जाची सुविधा उपलब्ध

googlenewsNext

नवी दिल्ली : हिरो इलेक्ट्रिकने (Hero Electric) आपल्या सर्व वाहनांसाठी सुलभ आणि त्रासमुक्त फायनान्स करण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत ( Axis Bank) करार केला आहे, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये. देशभरातील हिरो इलेक्ट्रिकच्या 750 डीलरशिप्सकडून ग्राहक टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. 

हिरो इलेक्ट्रिक आणि अॅक्सिस बँकेच्या भागीदारीमुळे ग्राहकांना आणखी बरेच फायदे मिळणार आहेत, येथे ग्राहक कमी कागदपत्रे सबमिट करून कोणत्याही त्रासाशिवाय आणि सहज टू-व्हीलर खरेदी करू शकतात.

हीरो इलेक्ट्रिकचे म्हणणे आहे की, या करारामुळे ग्राहकांना खूप चांगली खरेदी करण्याची संधी मिळेल. एक आर्थिक भागीदार म्हणून अॅक्सिस बँक स्वतंत्र ग्राहकांना कर्जाची रक्कम कस्टमाइज करण्यासाठी आणि सोबत डीलससाठी कमी किंवा जास्त होणाऱ्या कर्जाची कालावधी प्रदान करेल.

गेल्या काही महिन्यांत ईव्हीच्या मागणीत वाढ 
हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणाले, "गेल्या काही महिन्यांत आम्ही ईव्हीच्या मागणीत वाढ पाहिली आहे. हिरो आपल्या अनेक प्रयत्नांसह रहदारीचे वातावरण बदलण्यासाठी आणि ग्राहकांचा इलेक्ट्रिक  टू-व्हीलर ओनरशिपचा अनुभव वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.  टू-व्हीलर खरेदी करणे आणखी सोपे करण्यासाठी, आम्ही आमच्या परिने बदलण्यायोग्य फंडिंग पर्यायांचा विस्तार करत आहोत. वाढत्या मागणीसह, भारतातील लहान शहरे आणि ग्रामीण भागात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून तेथील रस्त्यांचेही इलेक्ट्रिफाय करता येईल."

भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना
अॅक्सिस बँकेतील रिटेल लेंडिंग अँड पेमेंट्सचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि हेड सुमित बाली म्हणाले, "आम्ही हिरोसोबत भागीदारी करताना अत्यंत आनंदी आहोत आणि आमच्या डीलर्सना तसेच ग्राहकांना सर्वोत्तम आर्थिक पर्याय प्रदान करू. देशभरातील आमचे मजबूत रिटेल बँकिंग नेटवर्क ग्राहकांना त्रासमुक्त खरेदी अनुभव प्रदान करेल. हा करार भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण करतो."

Web Title: Hero Electric partnered with axis bank for hassel free ownership experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.