'या' कंपनीकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री; Ola आणि Ather ला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 12:10 PM2022-09-03T12:10:38+5:302022-09-03T12:12:54+5:30

Electric Scooters : हिरो इलेक्ट्रिक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या हिरो इलेक्ट्रिकने 10,476 युनिट्स विकल्या आहेत. यात ओकिनावा क्रमांक दोन आणि अँपिअर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

hero electric sold more electric scooters than ola and ather | 'या' कंपनीकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री; Ola आणि Ather ला टाकले मागे

'या' कंपनीकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री; Ola आणि Ather ला टाकले मागे

Next

नवी दिल्ली : वाहन उत्पादकांनी ऑगस्टमधील आपल्या वाहनांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादकांच्या विक्रीचे आकडेही आले आहेत. विक्रीच्या बाबतीत टॉप-5 कंपन्यांमध्ये Hero Electric, Ampere, Okinawa, Ather Energy आणि TVS यांचा समावेश आहे. ओला इलेक्ट्रिक या यादीतून बाहेर आहे. हिरो इलेक्ट्रिक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या हिरो इलेक्ट्रिकने 10,476 युनिट्स विकल्या आहेत. यात ओकिनावा क्रमांक दोन आणि अँपिअर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Hero Electric
इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत हिरो इलेक्ट्रिकने पहिला क्रमांक पटकावला आहे. हिरो इलेक्ट्रिकने ऑगस्ट 2022 मध्ये 10,476 युनिट्सची विक्री केली आहे. जुलै 2022 मध्ये ही सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी होती. कंपनी भारतात Electric Optima CX, Electric NYX HS500, Electric Photon LP आणि Hero Eddy सारखी मॉडेल्स विकते.

Okinawa
या यादीत ओकिनावा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही देशातील दुसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी कंपनी आहे. जुलै 2022 मध्ये 8,093 युनिट्सच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये 8,554 युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विक्रीत वाढ झाली आहे. हाय स्पीड सेगमेंटमध्ये okhi-90, PraisePro, IPraise+, ridge सारखी मॉडेल्स आहेत. दुसरीकडे, कमी गती विभागात R30, Dual आणि Lite आहेत.

Ampere
ऑगस्ट 2022 मध्ये (भारतात) तिसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी कंपनी आहे. अॅम्पिअरने ऑगस्ट 2022 मध्ये 6,392 युनिट्सची विक्री केली आहे, जी जुलै 2022 मध्ये 6,312 युनिट्सची होती. त्याच्या विक्रीत थोडी वाढ झाली आहे. अॅम्पिअरचे Magnus EX आणि Reo Plus सारखे मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Ather Energy
ऑगस्ट 2022 मध्ये  Ather Energy ने विक्रीच्या बाबतीत फायदा मिळवला आणि सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकणाऱ्या टॉप-5 कंपन्यांमध्ये ती होती. Ather ने ऑगस्टमध्ये एकूण 5,239 युनिट्सची विक्री केली. कंपनीची 450X, 450 Plus मॉडेल्स भारतात येतात. कंपनीने अलीकडे Ather 450X Gen 3 इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च केली आहे.

TVS
या यादीतील शेवटचे TVS आहे, जे iQube इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज देते. कंपनीने ऑगस्टमध्ये एकूण 4,418 युनिट्सची विक्री केली आहे. TVS iQube गेल्या वर्षी जुलैमध्ये लॉन्च करण्यात आली होती.

Web Title: hero electric sold more electric scooters than ola and ather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.