Hero ने लाँच केली जबरदस्त बाईक, फीचर्समध्ये देते Royal Enfield ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:01 PM2022-12-21T13:01:50+5:302022-12-21T13:02:14+5:30

पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत फीचर्स

Hero has launched a stunning bike XPulse 200T 4V rivals Royal Enfield himalayan in terms of features | Hero ने लाँच केली जबरदस्त बाईक, फीचर्समध्ये देते Royal Enfield ला टक्कर

Hero ने लाँच केली जबरदस्त बाईक, फीचर्समध्ये देते Royal Enfield ला टक्कर

googlenewsNext

Hero XPulse 200T 4V: हीरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारपेठेत नवीन XPulse 200T 4V मोटरसायकल लाँच केली आहे. या बाईकची किंमत 1,25,726 रुपये (एक्स-शोरूम, मुंबई) पासून सुरू होते. हीरो बाईक ऑन-रोडसोबतच ऑफ-रोडसाठी वापरली जाऊ शकते. कंपनीची ही बाईक Royal Enfield Himalayan ला टक्कर देताना दिसत आहे. ही बाईक स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्ड या तीन नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ही मोटरसायकल त्यांच्या जवळच्या Hero MotoCorp डीलरशिपवरून खरेदी करू शकतात.

नवीन XPulse 200T 4V मध्ये 200cc 4 व्हॉल्व ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 19.1PS ची कमाल पॉवर आणि 17.3Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. नवी बाईक कंपनीच्या यापूर्वीच्या एडिशनपेक्षा 6 टक्के अधिक पॉवर आणि 5 टक्के अतिरिक्त टॉर्क जनरेट करते. शिवाय यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. याला समोर 37 मिमी फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक मिळतात. रायडरच्या सुरक्षिततेसाठी, यामध्ये 276mm फ्रंट आणि 220mm रियर पेटल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

लूक आणि फीचर्स
यात निओ-रेट्रो स्टाइलिंग आणि बोल्ड ग्राफिक्ससह सर्क्युलर फुल-एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी पोझिशन लॅम्प्स मिळतात. शिवाय रिलॅक् सीटिंग पोझिशन आणि  ट्यूब-टाईप रेट्रो पिलियन ग्रॅब मिळते. Hero XPulse 200T 4V मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, यूएसबी चार्जर, गियर इंडिकेटर आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफसह पूर्णपणे डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही देण्यात आलेय.

Web Title: Hero has launched a stunning bike XPulse 200T 4V rivals Royal Enfield himalayan in terms of features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.