हिरोच्या 'या' लोकप्रिय बाईकची Canvas Black Edition, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 03:03 PM2023-06-03T15:03:53+5:302023-06-03T15:04:11+5:30

Hero HF Deluxe: हीरो एचएफ डिलक्स कॅनव्हास (Hero HF Deluxe Canvas) कंपनीने ब्लॅक थीम, ब्लॅक इंजिन, ऑइल व्हील्स आणि फ्रंट फोर्कसह आणले आहे.

hero hf deluxe canvas black edition launched check price and other details | हिरोच्या 'या' लोकप्रिय बाईकची Canvas Black Edition, जाणून घ्या किंमत...

हिरोच्या 'या' लोकप्रिय बाईकची Canvas Black Edition, जाणून घ्या किंमत...

googlenewsNext

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) ग्राहकांसाठी Hero HF Deluxe चे स्पेशल कॅनव्हास ब्लॅक एडिशन लॉन्च केले आहे. कंपनीने या बाईकचे चार कलर ऑप्शन बाजारात आणले आहेत. यामध्ये कँडी ब्लेझिंग रेज, नेक्सस ब्लू, ब्लॅकसह हेवी ग्रे आणि स्पोर्ट्स रेडसह ब्लॅक आहेत. हिरोच्या या लोकप्रिय प्रवासी मोटरसायकलसाठी किती किंमत निश्चित करण्यात आली आहे आणि या बाईकवर किती वॉरंटी मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

हीरो एचएफ डिलक्स कॅनव्हास (Hero HF Deluxe Canvas) कंपनीने ब्लॅक थीम, ब्लॅक इंजिन, ऑइल व्हील्स आणि फ्रंट फोर्कसह आणले आहे. कंपनीने या बाईकच्या साइड पॅनलवर 3D HF डिलक्स चिन्ह देखील दिले आहे. बाईकला सेल्फ आणि सेल्फ i3S व्हेरिएंटवर ट्यूबलेस टायर्स सारखी काही स्टँडर्ड फीचर्स आहेत आणि एक USB चार्जर एक ऍक्सेसरी म्हणून येते.

XSens टेक्नॉलॉजीसह येणाऱ्या या बाईकमध्ये हिरो मोटोकॉर्पने 97.2 सीसी एअर कूल्ड, 4 स्ट्रोक, OHC,BS6 पीएफआय इंजिन दिले आहे. या बाईकमध्ये 9.6 लीटरची फ्यूल टँक देण्यात आली आहे. याशिवाय, साइड स्टँड इंडिकेटर, टो गार्ड आणि क्रोम लेग गार्ड सारखे फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने हीरो बाईक पाच वर्षांची वॉरंटी (स्टँडर्ड) आणि पाच मोफत सेवांसह लॉन्च केली आहे.

सर्व व्हेरिएंटच्या किंमती
Hero HF Deluxe Drum Kick Cast व्हेरिएंटची किंमत 60,760 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर, Hero HF Deluxe Drum Self Cast व्हेरिएंटची किंमत 66,408 रुपये, Hero HF Deluxe i3S ड्रम सेल्फ कास्ट व्हेरिएंटची किंमत 67,908 रुपये आणि Hero HF Deluxe गोल्ड ब्लॅक व्हेरिएंटची किंमत  67,208 रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम किंमती आहेत.

Web Title: hero hf deluxe canvas black edition launched check price and other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.