२० वर्षांपूर्वी Hero नं पहिल्यांदा लॉन्च केली होती बाईक, नव्या अवतारात होणार रिलॉन्च?; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 10:52 PM2023-03-23T22:52:14+5:302023-03-23T22:55:42+5:30

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प आपली लोकप्रिय बाइक Karizma पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.

hero karizma may be launch this year in new avatar expected price features detail | २० वर्षांपूर्वी Hero नं पहिल्यांदा लॉन्च केली होती बाईक, नव्या अवतारात होणार रिलॉन्च?; पाहा...

२० वर्षांपूर्वी Hero नं पहिल्यांदा लॉन्च केली होती बाईक, नव्या अवतारात होणार रिलॉन्च?; पाहा...

googlenewsNext

नवी दिल्ली-

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प आपली लोकप्रिय बाइक Karizma पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी ही बाइक या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करू शकते. Hero Karizma अगदी नव्या लूक आणि डिझाइनमध्ये बाजारात दाखल होणार आहे आणि ती नव्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. 

हिरो कंपनी या वर्षाच्या अखेरीस बाजारात आपली आयकॉनिक बाइक हिरो करिझ्मा पुन्हा एकदा लॉन्च करण्याची तयारी करत आहे. अद्याप याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी 210CC क्षमतेचं नवं लिक्विड-क्लूड प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे. याच आधारावर नवी बाईक तयार केली जाणार आहे. 

Hero Karizma आपल्या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय बाइक होती. २००३ साली बजाज कंपनीनं आपली Plusar रेंजसह 200CC सेगमेंटमध्ये धडाक्यात एन्ट्री केली होती. त्यावेळी Karizma बाइक 223CC क्षमतेसह एअर-कूल्ड इंजिनसह लॉन्च केली होती. खास स्पोर्टी लूक आणि दमदार इंजिनसह ही बाइक तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. पण पुढे जाऊन घटत्या मागणीमुळे कंपनीनं या बाइकचं उत्पादन बंद केलं होतं. 

नव्या इंजिनसह Karizma 
मीडिया रिपोर्टनुसार नवी करिझ्मा कंपनी 210CC क्षमतेचं नवं लिक्विड-कूल्ड इंजिन वापरणार आहे. जी ६-स्पीड गियरबॉक्ससह येणार आहे. हे इंजिन जवळपास 26PS ची पावर आणि 30Nm चं टॉर्क जरनेट करण्यास सक्षम असेल. नवी Karizma याआधीच्या मॉडलच्या तुलनेत जास्त पावरफुल असू शकते. याशिवाय बाइकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी, ब्लूटूथ टेक्नोलॉजी, LED लायटिंग इत्यादीचा वापर केला जाऊ शकतो. 

Web Title: hero karizma may be launch this year in new avatar expected price features detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.