Hero Lectro Mountain E-Bike: भन्नाट थ्रील! घर ते ऑफिस अवघ्या काही रुपयांत; ऑफरोडही चालवा ही ई-सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 01:12 PM2021-12-29T13:12:26+5:302021-12-29T13:13:44+5:30

Hero Lectro Mountain E-Bike F2i, F3i: ही भारतातील पहिली कनेक्टेड ई माऊंटेन बाईक आहे. यामध्ये अँडव्हेंटर राईडसाठी स्पोर्टी फ्रेमसह डिझाईन करण्यात आले आहे. ही ई बाईक शहर आणि गावात देखील वापरता येणार आहे. 

Hero Lectro Mountain E-Bike F2i, F3i: Home to office for just a few rupees; Run off-road is also an e-cycle | Hero Lectro Mountain E-Bike: भन्नाट थ्रील! घर ते ऑफिस अवघ्या काही रुपयांत; ऑफरोडही चालवा ही ई-सायकल

Hero Lectro Mountain E-Bike: भन्नाट थ्रील! घर ते ऑफिस अवघ्या काही रुपयांत; ऑफरोडही चालवा ही ई-सायकल

googlenewsNext

हिरोने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रीक सायकल लाँच केली आहे. याचे नाव F2i आणि F3i आहे. ही इलेक्ट्रीक सायकल शहरातील गुळगुळीत रस्ते तसेच ऑफ रोड देखील चालविता येणार आहे. ही सायकल चालविताना स्कूटर चालविल्याचा अनुभव मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  

Electric Scooter Vs. Bike: इलेक्ट्रीक स्कूटर घेऊ की बाईक? आधी फरक समजून घ्या...; सोपे जाईल

ही भारतातील पहिली कनेक्टेड ई माऊंटेन बाईक आहे. यामध्ये अँडव्हेंटर राईडसाठी स्पोर्टी फ्रेमसह डिझाईन करण्यात आले आहे. ही ई बाईक शहर आणि गावात देखील वापरता येणार आहे. 

या सायकलला तुम्ही एका अॅपद्वारे कंट्रोल करू शकता. ही सायकल ब्ल्यूटूथद्वारे आरामात कनेक्ट होते. ही सायकल चार ऑपरेशन मोडसोबत येते. यामध्ये पेडलेक (35 किमी रेंज), थ्रॉटल (27 किमी रेंज), क्रूझ कंट्रोल आणि मॅन्युअल मोड आहेत. ही एक हायब्रिड सायकल आहे. पॅडल आणि बॅटरी आदीवर ही सायकल आरामात चालते. पॅडल मारून दमलात तर याचा ऑपरेशन मोड ऑन करून बॅटरीवर चालू शकते. यामध्ये एक स्मार्ट एलईडी डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. 

बॅटरी
दोन्ही सायकलमध्ये इलेक्ट्रिक-एमटीबी एक हाय कॅपॅसिटीची 6.4Ah IP67 रेटेड बॅटरी आणि एक हाय टॉर्कची 250W BLDC मोटर देण्यात आली आहे. यामध्ये 7 स्पीड गिअर देण्यात आला आहे. ही ई बाईक सिंगल चार्जवर ३५ किमीची रेंज देते. 
हिरो लेक्ट्रो (Hero Lectro) ही कंपनीच्या आरअँडडी सेंटरमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. या ई बाईकची किंमत 39,999 रुपये आणि 40,999 रुपये आहे. 

बुकिंग कसे कराल...
Hero Lectro F2i आणि Hero Lectro F3i घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीचे ६०० हून अधिक डिलर्स आहेत. त्यांच्याकडे नाहीतर तुम्ही ऑनलाईनदेखील ही ई-बाईक बुक करू शकता. 
 

Web Title: Hero Lectro Mountain E-Bike F2i, F3i: Home to office for just a few rupees; Run off-road is also an e-cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.