कार पाठोपाठ बाईकच्याही किंमती वाढणार; Hero Motocorp नं केली किंमती वाढवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:13 PM2021-03-24T19:13:03+5:302021-03-24T19:15:58+5:30

Hero Motocorp १ एप्रिल पासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवणार आहे. पाहा किती होणार दरवाढ

Hero MotoCorp to increase prices of motorcycles scooters from April 1 maruti suzuki nissan cars too | कार पाठोपाठ बाईकच्याही किंमती वाढणार; Hero Motocorp नं केली किंमती वाढवण्याची घोषणा

कार पाठोपाठ बाईकच्याही किंमती वाढणार; Hero Motocorp नं केली किंमती वाढवण्याची घोषणा

Next
ठळक मुद्देकंपनी १ एप्रिल पासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवणार आहे. निस्सान आणि मारूती सुझुकीनंही केली दरवाढीची घोषणा

बाईक्स आणि स्कूटर्सचं उत्पादन करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पनं आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कंपनीनं यासंदर्भातील घोषणा केली. यापूर्वी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी आणि निस्सानही आपल्या कारच्या किंमती १ एप्रिलपासून वाढवण्याची घोषणा केली होती.

कच्चा मालाची किंमत वाढल्यामुळे आपल्याला बाईक्स आणि स्कूटरच्या किंमती वाढवाव्या लागत असल्याची माहिती Hero Motocorp ने शेअर बाजाराला दिली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार निरनिराळ्या प्रकारातील वाहनांनुसार त्याच्या किंमतीत अडीच हजार रूपयांपर्यंत वाढ केली जाणार आहे. कंपनीची ही दरवाढ १ एप्रिल पासून लागू होणार आहे. 

निस्सानच्याही गाड्या महागणार

ऑटो पार्ट्सच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीनं किंमती न वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु आता कंपनी सर्व Nissan आणि Datsun च्या गाड्यांच्या किंमती वाढवणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. तसंच प्रत्येक व्हेरिअंटप्रमाणे या किंमती निरनिराळ्या असतील असंही कंपनीनं स्पष्ट केलं. प्रत्येक व्हेरिअंटनुसार गाड्यांच्या किंमती वाढवल्या जात आहे. परंतु आताही भारतीय ग्राहकांना बेस्ट व्हॅल्यू प्रपोझिशन उपलब्ध करून दिलं जात आहे, अशी प्रतिक्रियाा निसान मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी दिली. 

मारूती सुझुकीही करणार दरवाढ

एप्रिल महिन्यात Maruti Alto पासून Maruti Brezza पर्यंत अनेक कार्स महाग होणार आहेत. या वर्षात कंपनी दुसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार आहे. यापूर्वी कंपनीनं जानेवारी महिन्यात आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या होत्या. Maruti Suzuki नं दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ निरनिराळ्या कार्सच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे. परंतु कोणत्या कारची किंमत किती वाढेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाहन क्षेत्राला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसंच मागणी कमी आणि कारसाठी आवश्यक असलेल्या अन्य उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली होती.
 

Web Title: Hero MotoCorp to increase prices of motorcycles scooters from April 1 maruti suzuki nissan cars too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.