Hero MotoCorp च्या दोन धाकड बाईक लाँच; तिसरी बाईक कोणती?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 06:09 PM2019-05-01T18:09:43+5:302019-05-01T18:11:44+5:30
तिसरी सुपर बाईकही लाँच केली आहे.
भारताची दुचाकी निर्मिती करणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पने आज दोन थरारक अनुभव देणाऱ्या बाईक लाँच केल्या. Xpulse 200 आणि XPulse 200T या ऑफरोड आणि ऑनरोड बाईकची किंमत अनुक्रमे 97,000 रुपये आणि 1,05,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच तिसरी सुपर बाईकही लाँच केली आहे.
या दोन खतरनाक बाईकचा लूक ऑफरोड रेसिंगच्या बाईकसारखाच ठेवण्यात आला आहे. बसण्याची सीट उंच, पुढील हँडलही उंच आणि हेडलँप गोलाकार ठेवण्यात आले आहेत. Xpulse 200 मध्ये लांबलचक पुढील मडफ्लॅप आणि स्टड असलेले टायर असणार आहेत. बाईकमध्ये खडबडीतपणा आणण्यासाठी हँडलवरील नॅक गार्ड आणि लिव्हरवरील सेफगार्ड नव्या रुपात देण्यात आला आहे. तसेच ऑईल संपला सुरक्षा देणारी प्लेटचा आकारही बदलण्यात आला आहे.
दोन्ही मोटारसायकल या 200 सीसी इंजिनाने युक्त आहेत. हे इंजिन 18.4 बीएचपी ताकद आणि 17.1 एनएमचा टॉर्क देते. दोन्ही चाकांची साईज वेगवेगळी आहे. पुढील चाक 21 आणि मागील चाक 18 इंचाचे देण्यात आले आहे. तसेच एबीएसही देण्यात आले आहे.
तिसरी मोटारसायकल होंडा एक्सस्ट्रीम 200R ही बाईकही लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत Rs 98,000 रुपये ठेवण्यात आली आहे.