Hero ची 'हिरोगिरी'; 2023 मध्ये विकल्या सर्वाधिक दुचाकी, आकडा ऐकून चकीत व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 03:48 PM2024-01-03T15:48:03+5:302024-01-03T15:48:37+5:30
Hero MotoCorp: मागील अनेक वर्षांपासून भारतीय टू-व्हिलर मार्केटमध्ये हिरोचा दबदबा कायम आहे.
Hero MotoCorp Sales: हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp ) टू-व्हिलर सेगमेंटची बादशाह आहे. ही जगातली सर्वात मोठी टू-व्हिलर मेकर कंपनी आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हिरोचाच दबदबा आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक मार्केट शेअरसह ही नंबर-1 टू-व्हिलर बनली कंपनी आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच 2023 मध्ये हिरो मोटोकॉर्पच्या गाड्यांची सर्वाधिक विक्री झाली. वर्षभरात कंपनीने तब्बल 54.99 लाख गाड्या विकल्या.
हिरो मोटोकॉर्पने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये कंपनीने 52.47 लाख टू-व्हिलर विकल्या होत्या. 2023 मध्ये कंपनीच्या विक्रीत पाच टक्के वाढ झाली. गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात, म्हणजेच डिंसेबरमध्ये विक्रीत किरकोळ घट झाली. 2022 मध्ये 3,94,179 युनिट्सची विक्री झाली होती, तर 2023 च्या शेवटच्या महिन्यात 3,93,952 युनिट विकले.
डिसेंबर 2023 मध्ये कंपनीच्या 39,294 स्कुटर विकल्या गेल्या, तर त्यापूर्वी याच काळात 37,430 युनिट्सची विक्री झाली होती. त्यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीने 491,050 गाड्यांची विक्री केली, जी 2022 नोव्हेंबरच्या तुलनेत 26% ज्यास्त आहे. एकूणच काय तर, भारतीय दुचाकी मार्केटमध्ये हिरोची हिरोगिरी कायम राहिली आहे.