Hero ची 'हिरोगीरी', FY24 मध्ये विकल्या 56 लाख गाड्या; व्यवसायाचा केला विस्तार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:46 PM2024-04-02T18:46:14+5:302024-04-02T18:46:39+5:30
Hero MotoCorp: हीरो मोटोकॉर्प फक्त भारतातील नाही, तर जगातील सर्वात मोठी टू-व्हिलर कंपनी आहे.
Hero MotoCorp Sales: Hero MotoCorp ही फक्त भारतातील नाही, तर जगातील सर्वात मोठी टू-व्हिलर कंपनी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 56,21,455 दुचाकींची विक्री काली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री आणि निर्यात, या दोन्हींचा समावेश आहे. FY 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत 10% वाढ झाली. तसेच, Hero MotoCorp च्या जागतिक व्यवसायातदेखील संपूर्ण आर्थिक वर्षात 16% वाढ झाली आहे.
मार्च 2023 मध्ये कंपनीने 490,415 बाईक आणि स्कूटर विकल्या होत्या. Hero च्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीतही वाढ झाली आहे. कंपनीने मार्च महिन्यात 4,000 पेक्षा जास्त VIDA V1 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. विशेष म्हणजे, आपल्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida चा Hero MotoCorp ने देशातील 100 हून अधिक शहरांमध्ये विस्तार केला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात, Hero MotoCorp ने प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटमध्ये अनेक बाईक लॉन्च केल्या, ज्यात Xtreme 125R, Xtreme 200S, Xtreme 160R 4V, Harley-Davidson X440, Karizma XMR आणि Mavrick 440 चा समावेश आहे. याशिवाय कंपनीने आपले नेटवर्कही मजबूत केले. 75 प्रीमिया आउटलेट उघडण्यात आले आणि 400 हून अधिक Hero 2.0 स्टोअर्स सुरू करण्यात आली.
हिरोने मिलानमधील EICMA मोटर शो आणि स्वतःच्या हिरो वर्ल्ड इव्हेंटमध्ये अनेक गाड्या दाखवल्या. कंपनीने कन्व्हर्टिबल व्हेइकल- Surge S32, पाथ ब्रेकिंग EV कॉन्सेप्ट - Lynx आणि Acro, तसेच फ्लेक्स-इंधन स्कूटर्सची श्रेणी - Xoom (125 आणि 160), नवीन VIDA V1 आणि V1 कूपचे प्रदर्शन केले.