'ही' इलेक्ट्रिक स्कूटर 6,000 रुपयांनी महागली, जाणून घ्या नवीन किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 06:50 PM2023-06-04T18:50:24+5:302023-06-04T18:51:10+5:30
हिरो मोटोकॉर्पच्या Vida V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आता मुंबईत 1 लाख 45 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडीत कपात करण्यात आल्यामुळे हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 Pro च्या किमतीत 6,000 रुपयांनी वाढ केली आहे. जर तुम्हीही हीरो ब्रँडची ही लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर याच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घ्या...
हिरो मोटोकॉर्पच्या Vida V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आता मुंबईत 1 लाख 45 हजार 900 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तसेच, अहमदाबाद, नवी दिल्ली, वडोदरा आणि सुरत सारख्या शहरांमध्ये ही स्कूटर आता 1 लाख 25 हजार 900 रुपयांना (एक्स-शोरूम) खरेदी केली जाऊ शकते. या किमतीमध्ये पोर्टेबल चार्जर आणि FAME II सबसिडी समाविष्ट आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.94kWh बॅटरी आहे, जी 5 तास 55 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होते. या स्कूटरबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 165 किलोमीटरपर्यंत धावू शकते. दरम्यान, ही स्कूटर 3.2 सेकंदात 40 चा स्पीड पकडते आणि या स्कूटरचा टॉप स्पीड 80kmph आहे.
TVS iQube 22 हजार रुपयांपर्यंत महाग
अलीकडेच TVS मोटरने या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 17 हजार रुपयांवरून 22 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच, ओला इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरच्या किंमतीत 15,000 रुपयांची वाढ केली आहे. किंमतवाढीनंतर, Ola S1 Pro ची किंमत आता 1,39,999 रुपये आणि Ola S1 ची किंमत 1,29,999 रुपये आहे, या दोन्हीच्या एक्स-शोरूम किमती आहेत.