गुंतवणूकदारांची निराशा; Hero मोटर्सने 900 कोटींचा IPO मागे घेतला, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 07:03 PM2024-10-07T19:03:19+5:302024-10-07T19:03:52+5:30

Hero Motors IPO Update: हीरो मोटर्सने SEBI कडे जमा केलेले कागदपत्र परत घेतले आहेत.

Hero Motors IPO: Investors disappointed; Hero Motors withdraws IPO of 900 crores, why..? | गुंतवणूकदारांची निराशा; Hero मोटर्सने 900 कोटींचा IPO मागे घेतला, कारण काय..?

गुंतवणूकदारांची निराशा; Hero मोटर्सने 900 कोटींचा IPO मागे घेतला, कारण काय..?

Hero Motors IPO: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. त्याचा परिणाम आयपीओ मार्केटवरही पडू लागला आहे. यामुळेच आता, देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero Motors Company Group ची ऑटो कंपोनंट फर्म Hero Motors Limited ने आपला IPO लॉन्च करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. हिरो मोटर्स लिमिटेडने 900 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करण्यासाठी शेअर बाजार नियामक SEBI कडे दाखल केलेले कागदपत्रही मागे घेतले आहेत.

Hero Motors ने SEBI कडे सादर केलेल्या प्रस्तावित IPO च्या मसुद्यानुसार, Rs 900 कोटी IPO मध्ये, कंपनीने 500 कोटी रुपयांचे शेअर्स ताज्या इश्यूद्वारे आणि 400 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकण्याची योजना आखली होती. कंपनीच्या प्रवर्तकांनी ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीतील आपला हिस्सा विकण्याची योजना आखली होती. ऑफर फॉर सेलमध्ये, ओपी मुंजाल होल्डिंग्स 250 कोटी रुपयांचे शेअर्स, भाग्योदय इन्व्हेस्टमेंट्स आणि हिरो सायकल्स 75 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार होते. 

हिरो मोटर्समध्ये प्रवर्तक ओपी मुंजाल होल्डिंग्सची सर्वाधिक 71.55 टक्के भागीदारी आहे. तर भाग्योदय इन्व्हेस्टमेंटकडे 6.28 टक्के आणि हिरो सायकल्सकडे 2.03 टक्के हिस्सा आहे. याशिवाय, Hero Motors मध्ये South Asia Growth Invest LLC ची 12.27 टक्के हिस्सेदारी आहे.

IPO प्रस्ताव 5 ऑक्टोबर रोजी मागे घेतला
Hero Motors Limited ने ऑगस्ट 2024 मध्ये IPO लॉन्च करण्यासाठी SEBI कडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. IPO मागे घेण्याच्या कारणांचे स्पष्टीकरण देताना कंपनीने सांगितले की, Hero Motors Limited ने 5 ऑक्टोबर 2024 रोजी ड्राफ्ट पेपर मागे घेतला आहे. कंपनीने नवीन शेअर्स देऊन उभी केलेली रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर येथील कंपनीच्या प्लांटच्या विस्तारासाठी वापरण्याची योजना होती.

BMW आणि Ducati हेदेखील ग्राहक 
हिरो मोटर्स लिमिटेड इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक पॉवरट्रेन तयार करते. त्याचे ग्राहक अमेरिका, युरोप, भारत आणि ASEAN मधील OEM आहेत. BMW, Ducati, Envylo International, Formula Motorsport, Humming Bird EV, HWA सारख्या कंपन्या हीरो मोटर्सच्या ग्राहक आहेत. हीरो मोटर्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे, जी जागतिक ई-बाईक कंपन्यांसाठी CVT तयार करते. कंपनीच्या भारत, ब्रिटन आणि थायलंडमध्ये 6 उत्पादन कंपन्या आहेत.

Web Title: Hero Motors IPO: Investors disappointed; Hero Motors withdraws IPO of 900 crores, why..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.