Hero Passion XTEC: 'हिरो पॅशन'च्या नव्या मॉडलची पहिली झलक, LED हेडलॅम्प अन् स्मार्ट फिचर्स; जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:04 PM2022-07-12T17:04:52+5:302022-07-12T17:06:03+5:30
देशातील सर्वात मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी हिरो मोटोकॉपनं पॅशन मोटारसायकलच्या नव्या मॉडलची जाहीरात लॉन्च केली आहे.
देशातील सर्वात मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी हिरो मोटोकॉपनं पॅशन मोटारसायकलच्या नव्या मॉडलची जाहीरात लॉन्च केली आहे. कंपनीनं Passion XTEC मॉडलसह पॅशन लाइनअपला आणखी मजबूत केलं आहे. या मोटारसायकलमध्ये अनेक स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. टीझरमध्ये LED हेडलाइट, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे जबरदस्त फिचर्स पाहायला मिळतात. हिरो कंपनीनं पॅशनचे XTEC चे दोन व्हेरिअंट बाजारात दाखल केले आहेत. यात ड्रम व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत ७४,५९० रुपये आहे. तर डिस्क व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत ७८,९९० रुपये इतकी आहे.
LED हेृडलाइट यूनिट
पॅशन XTEC ला सध्याच्या मॉडलच्या तुलनेत थोडं हटके आणि शानदार स्टाइलसह पेश करण्यात आलं आहे. हॅलोजन हेडलॅम्पच्या जागी LED हेडलाइटचा वापर करण्यात आला आहे. यात H शेपसह इंटिग्रेटेड LED DRLs देखील पाहायला मिळतात.
नवी पॅशन नवे फिचर्स
हिरोनं नव्या बाइकमध्ये SMS आणि कॉल अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे अत्याधुनिक फिचर्स दिले आहेत. पॅशनच्या नव्या मॉडलमध्ये USB चार्जिंग पोर्ट, क्रोम फिनिश्ड 3D ब्रान्डिंग आणि दमदारपणा उठून दिसावा यासाठी फ्लूअल टँकवर रिम टेप पाहायला मिळते. चालकाच्या सुरक्षेसाठी कंपनीनं एक साइड स्टँड व्हिजुअल इंडिकेटर आणि साइट स्टँड इंजिन कट ऑफ स्विच देखील दिला आहे.
इंजिन आणि वॉरंटी
Hero Passion XTEC चं इंजिन लाइनअप पॅशन प्रोमधून घेण्यात आलं आहे. हे 113 CC, एअर कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिनसह उपलब्ध आहे. या बाइकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसंच उत्तम मायलेजसाठी i3S (आयडियल स्टार्ट स्टॉप सिस्टम) देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हिरो मोटोकॉपनं या मॉडलवर ५ वर्षांची स्टॅंडर्ड वॉरंटी देखील दिली आहे.