Hero Pleasure+ XTec : हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 03:21 PM2021-10-12T15:21:18+5:302021-10-12T15:21:30+5:30

Hero Pleasure+ XTec : Hero MotoCorp ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना भुरळ घालण्यासाठी Pleasure+ Xtec वर मोठी बाजी लावत आहे.

Hero Pleasure Plus Xtec Price Gets New Features Digital Analog Speedometer With Bluetooth Connectivity | Hero Pleasure+ XTec : हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत....

Hero Pleasure+ XTec : हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत....

googlenewsNext

हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) देशात नवीन Pleasure + XTec  स्कूटर लाँच केली आहे. स्कूटर आता अनेक नवीन फीचर्ससह सुसज्ज आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनलॉग स्पीडोमीटर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि इतर फीचर्सचा समावेश आहे. सणांच्या निमित्ताने नवीन मॉडेल लाँच केल्याने विक्री वाढण्यास मदत होईल. (Hero Pleasure Plus Xtec Price Gets New Features Digital Analog Speedometer With Bluetooth Connectivity)

Hero MotoCorp ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना भुरळ घालण्यासाठी Pleasure+ Xtec वर मोठी बाजी लावत आहे. तसेच, सेगमेंटमधील इतर स्कूटरशी स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने नवीन स्कूटरमधील फीचर्समध्ये वाढ केली आहे. उदाहरणार्थ, डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर आता कॉल आणि एसएमएस अलर्ट सारख्या फंक्शन्ससह येतो. या नवीन स्कूटरमध्ये I3S टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, ज्यात आयडल-स्टॉप-स्टार्ट सिस्टमची फीचर्स आहेत.

Hero MotoCorp ने ही स्कूटर अशा प्रकारे तयार केली आहे की, ती ग्राहकांच्या मोठ्या गटाला आकर्षित करू शकेल. Hero MotoCorp चे सेल्स अँड आफ्टरसेल्सचे प्रमुख नवीन चौहान म्हणाले, "आयकॉनिक प्लेझर ब्रँडची ग्राहकांसोबत मजबूत पकड आहे. अनेक पहिल्या-सेगमेंट फीचर्ससह, नवीन प्लेझर+ 'एक्सटेक' आमच्या स्कूटर पोर्टफोलिओला बळकट करेल. तरुणांना खूप आनंद देईल."

लूक आणि डिझाइन कशी आहे?
Hero MotoCorp च्या या नवीन स्कूटरमध्ये प्रोजेक्टर हेड लाइट देण्यात आला आहे, जो या सेगमेंटमधील कोणत्याही स्कूटरमध्ये पहिल्यांदा दिला आहे. कंपनीचा असा दावा आहे की, प्रोजेक्टर हेड लाइट लांब आणि विस्तीर्ण पोहोच आणि अँटी-फॉग फीचर्ससह 25 टक्के अधिक लाइटची तीव्रता प्रदान करतो. 

याशिवाय, स्कूटरला मिरर, मफलर प्रोटेक्टर, हँडल बार, सीट बॅकरेस्ट आणि फेंडर स्ट्राइपवर क्रोम फिनिश देण्यात आले आहे. सीट ड्युअल टोन कलरसह आली आहे, तर आतील पॅनेल कलर्ड आहे. प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी सीट बॅकरेस्टमध्ये सुधारणा केली गेली आहे, तर मेटल फ्रंट फेंडर्स अधिक टिकाऊ असल्याचा दावा केला जात आहे.

Hero Pleasure plus xtec

इंजिन आणि पॉवर
Hero Pleasure+XTec स्कूटरला 110cc बीएस -6 इंजिन मिळते. हे इंजिन 7000 rpm वर 8 bhp पॉवर आणि 5500 rpm वर 8.7 Nmचा टॉर्क जनरेट करते.

कलर ऑप्शन
Hero Pleasure + Xtec ला सात कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. 

किती आहे किंमत?
कंपनीने भारतीय बाजारात Hero Pleasure+ XTec ची किंमत LX व्हेरिएंटसाठी 61,000 रुपये आणि Pleasure + 110 XTec व्हेरिएंटसाठी 69,500 रुपये किंमत निश्चित केली आहे.

Web Title: Hero Pleasure Plus Xtec Price Gets New Features Digital Analog Speedometer With Bluetooth Connectivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.