Hero Upcoming Models : सणासुदीच्या काळात Hero लाँच करणार 8 नवीन स्कूटर आणि बाइक्स! 'ही' इलेक्ट्रिक स्कूटरही येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 04:38 PM2022-09-27T16:38:24+5:302022-09-27T16:39:15+5:30
Hero Upcoming Models : आगामी हिरो इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे तर, कंपनीच्या नवीन Vida सब-ब्रँड अंतर्गत येणारे हे पहिले मॉडेल असणार आहे.
नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) या सणासुदीच्या काळात 8 नवीन मॉडेल्स (बाइक आणि स्कूटरसह) लाँच करण्याची योजना आखत आहे. आगामी मॉडेल ग्राहकांच्या आणि विशिष्ट प्रादेशिक बाजारपेठांच्या गरजा लक्षात घेऊन आणले जातील, असे कंपनीने पुष्टी केली आहे. हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर रणजीवजीत सिंग म्हणाले की, 2022 चा दिवाळी हंगाम दुचाकी उत्पादकांसाठी निश्चितच चांगला असणार आहे. बाजारात किंवा विशेषतः ग्रामीण भागात प्रचंड मागणी आहे.
दरम्यान, आगामी नवीन हिरो बाइक्स आणि स्कूटर्सबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, लाइनअपमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Hero Vida), Xtreme 160R Stealth 2.0 Edition, सध्याच्या मॉडेलमधील अपडेटेड व्हर्जन आणि नवीन कलर व्हेरिएंटचा समावेश असण्याची शक्यता आहे. आगामी हिरो इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलायचे तर, कंपनीच्या नवीन Vida सब-ब्रँड अंतर्गत येणारे हे पहिले मॉडेल असणार आहे.
ई-स्कूटरची किंमत सुमारे 1 लाख रुपये असण्याची शक्यता आहे आणि ती बजाज ई-चेतक, टीव्हीएस आयक्यूब, ओला एस 1 प्रो यासारख्या बाइक्सना आव्हान देईल. Hero Vida स्कूटर जयपूरमधील ब्रँडच्या R&D हब सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) येथे विकसित करण्यात आली आहे. हिरोच्या आंध्र प्रदेशातील सुविधेचा वापर इलेक्ट्रिक स्कूटरसाठी उत्पादन केंद्र म्हणून केला जाईल.
कंपनीने पुष्टी केली आहे की, ती 7 ऑक्टोबर 2022 रोजी आपल्या आगामी ई-स्कूटरची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्सचा खुलासा करेल. यासोबतच या सणासुदीच्या हंगामात देशांतर्गत दुचाकी उत्पादक कंपनी हिरो Maestro Xoom स्कूटर आणणार आहे. हे Maestro Edge च्या वरील मॉडेल असेल, ज्याची किंमत ड्रम व्हेरिएंटसाठी 66,820 रुपये आणि डिस्क व्हेरिएंटसाठी 73,498 रुपये आहे. नियमित मॉडेलच्या तुलनेत यात काही अतिरिक्त फीचर्स आणि कॉस्मेटिक बदल मिळतील.