Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:50 PM2024-10-21T15:50:41+5:302024-10-21T15:51:13+5:30

जर तुम्हाला हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची असेल तर याबद्दल जाणून घेऊ शकता.

Hero Shubh Muhurat offer buy scooter at fifteen thousand rupees benefits | Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!

Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!

नवी दिल्ली : सणासुदाचा काळ सुरु होता आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. भारतात धनत्रयोदशी आणि दिवाळीला जास्तीत जास्त वाहनांची विक्री होते. याच पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपल्या 4 स्ट्रोक स्कूटर्सवर मोठी ऑफर दिली आहे. जर तुम्हाला हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची असेल तर याबद्दल जाणून घेऊ शकता.

हिरोची Xoom स्कूटर
हिरो मोटोकॉर्पच्या या स्कूटरमध्ये BS6 सीरीजचे 110cc इंजिन आहे, जे 8.05bhp पॉवर जनरेट करते. हीरोची ही स्कूटर 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग फक्त 9.35 सेकंदात घेऊ शकते. यासोबतच या स्कूटरला फ्रंट डिस्क ब्रेक आणि इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम मिळते. Hero Xoom स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, या स्कूटरची किंमत 2 लाख 52 हजार रुपयांपासून सुरू होते. तसेच, 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

हिरोची Destini स्कूटर
हिरोची ही स्कूटर 124.6cc इंजिनसह येते, जी 9 bhp पॉवर जनरेट करते. हिरोने या स्कूटरमध्ये एलईडी हेडलॅम्प, क्रोम मिरर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली आहे. जर तुम्हाला Destini स्कूटर खरेदी करायची असेल तर त्याची किंमत 80,048 रुपयांपासून सुरू होते.

हिरोची Pleasure + XTEC स्कूटर
हिरोची ही स्कूटर स्पोर्टी स्ट्रिप थीमवर बाजारात आणली आहे. या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हेडलॅम्प आणि मेटर फॅन सारखे फीचर्स दिले आहेत. हिरोच्या या स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन आहे, जे 8 bhp पॉवर जनरेट करते. हीरोची ही स्कूटर तुम्ही 83,113 रुपयांना खरेदी करू शकता.

हिरोच्या तिन्ही स्कूटरवर ऑफर!
हिरो मोटोकॉर्पच्या या तीन स्कूटर्स देशभरातील कोणत्याही हिरो डीलरकडून खरेदी केल्या जाऊ शकतात. कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही स्कूटरवर 5000 रुपयांची सूट आणि 15000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील.
 

Web Title: Hero Shubh Muhurat offer buy scooter at fifteen thousand rupees benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.