Hero Splendor: हिरो मोटोकॉर्पची स्प्लेंडर नव्या दमदार रूपात आली; डिजिटल मीटरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 02:13 PM2022-06-17T14:13:08+5:302022-06-17T14:14:10+5:30

जगातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय स्प्लेंडर मोटारसायकलची नवीन एडिशन ‘स्प्लेंडर एक्सटेक’ नुकतीच लाँच केली आहे.

Hero Splendor 2022 comes in a new form Bluetooth connectivity with digital meter and usb charging | Hero Splendor: हिरो मोटोकॉर्पची स्प्लेंडर नव्या दमदार रूपात आली; डिजिटल मीटरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी!

Hero Splendor: हिरो मोटोकॉर्पची स्प्लेंडर नव्या दमदार रूपात आली; डिजिटल मीटरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी!

googlenewsNext

नवी दिल्ली:

जगातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय स्प्लेंडर मोटारसायकलची नवीन एडिशन ‘स्प्लेंडर एक्सटेक’ नुकतीच लाँच केली आहे.

हिरो स्प्लेंडर  एक्सटेक ही गाडी किमान ७३,१७० रुपये किमतीपासून (एक्स-शोरूम, मुंबई) हिरो मोटोकॉर्प डिलरशिप्समध्ये उपलब्ध असेल. ही गाडी पाच वर्षांच्या वॉरंटीसह येते. हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वृद्धी अधिकारी रणजिवजित सिंग यांनी सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की, हिरो स्प्लेंडर एक्सटेक पुन्हा एकदा नवीन बेंचमार्क स्थापित करेल आणि आरामदायीपणा व सुरक्षिततेच्या ब्रँडचे वचन कायम ठेवेल. ही मोटारसायकल जवळपास तीन दशकांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करीत आहे. 

यूएसबी चार्जरही..
फुल डिजिटल मीटरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल व एसएमएस अलर्ट, आरटीएमआय, लो फ्यूएल इंडिकेटर आणि आकर्षक ग्राफिक्स ही या गाडीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय या मोटारसायकलमध्ये इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर, साइड-स्टॅण्ड इंजिन कट-ऑफ या अत्याधुनिक सुविधासुद्धा आहेत.

Web Title: Hero Splendor 2022 comes in a new form Bluetooth connectivity with digital meter and usb charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.