Hero's EZephyr: हिरोची ई-सायकल आली; 7 रुपयांत 100 किमी धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 03:26 PM2018-09-10T15:26:09+5:302018-09-10T15:30:26+5:30
नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती.
नवी दिल्ली : नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती. यामध्ये भारतीय कंपनी हिरो मोटर्सने तिची ई-सायकलही प्रदर्शनात मांडली होती. ही सायकल केवळ 7 रुपयांत 100 किमीचे मायलेज देणार आहे.
हिरो सायकल्सने त्यांची स्वस्त:तली ई-बाइक EZephyr लाँच केली. या बाईकची किंमत 27 हजार रुपये आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर ई-बाइकपेक्षा EZephyr स्वस्त आहे. या सायकलचे वजन 16 किलो आहे. तर पुढील चाकाला डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. 18 इंचाच्या फ्रेमसाईजला प्लॅस्टिक पॅडल दिले गेले आहेत. बाजारात या ई-सायकलचे विविध प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत.
एका अभ्यासानुसार दररोज 32 कोटी लोक रोज पायी कामावर जातात. यातील 12 टक्के लोकांना प्रवास करण्याचे साधन उपलब्ध केल्यास देशाचा विकास दर 100 टक्क्यांनी वाढेल, असे हिरो मोटर्स कंपनीचे चेअरमन पंकज मुंजाल यांनी सांगितले.
या प्रकारच्या बाईकमुळे प्रदूषण, राहणीमानाशी संबंधीत आजार, वाहतूक कोंडी आदींपासून सुटका होईल.