हिरोची जबरदस्त फिचर्सची नवीन ‘पॅशन एक्सटेक’ बाजारात; 'ही' सर्वोत्तम वैशिष्ट्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 09:11 AM2022-07-08T09:11:35+5:302022-07-08T09:12:14+5:30
हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वृद्धी अधिकारी रणजीवजित सिंग यांनी सांगितले की, हिरो पॅशन हा प्रतिष्ठित ब्रॅण्ड असून दशकापासून ग्राहकांचा प्रचंड विश्वास राहिला आहे.
पुणे : सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय पॅशन मोटारसायकलची नवीन एडिशन ‘पॅशन एक्सटेक’ नुकतीच लाँच केली आहे. ही दुचाकी ७४,९४० रुपयांपासून उपलब्ध आहे. केवळ ‘पॅशन एक्सटेक’मध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली असून, ही दुचाकी इतर मोटारसायकल्सपेक्षा वरचढ ठरली आहे.
हिरोच्या जागतिक उत्पादन नियोजनाचे प्रमुख मालो ली मेसन म्हणाले, ‘एक्सटेक’ उत्पादनांची श्रेणी जसे स्प्लेंडर एक्सटेक, ग्लॅमर १२५ एक्सटेक, प्लेझर ११० एक्सटेक आणि डेस्टिनी १२५ एक्सटेकला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला पॅशन एक्सटेक हा ट्रेंड कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.’ हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वृद्धी अधिकारी रणजीवजित सिंग यांनी सांगितले की, हिरो पॅशन हा प्रतिष्ठित ब्रॅण्ड असून दशकापासून ग्राहकांचा प्रचंड विश्वास राहिला आहे. नवीन स्टाइलमुळे पॅशन एक्सटेक आधुनिक राइडर्सचे लक्ष वेधून घेईल आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही बेंचमार्क स्थापित करेल. (वा.प्र)
ही सर्वोत्तम वैशिष्ट्ये...
n नवीन हिरो पॅशन ‘एक्सटेक’मध्ये स्टाइल, सुरक्षितता, कनेक्टिव्हिटी व आरामदायीपणाचे परिपूर्ण संयोजन.
n या मोटारसायकलमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, फुल-डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, एसएमएस व कॉल अलर्टस्, रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर, लो-फ्यूएल इंडिकेटर, साइड-स्टॅण्ड इंजिन कट-ऑफ आणि सर्व्हिस रिमांइडर अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.