अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:14 PM2024-05-02T12:14:05+5:302024-05-02T12:14:20+5:30
भारतातही क्रॅश टेस्टिंग सुरु झाली आहे. यामध्ये मारुती कोणत्या कार पाठविते आणि त्या किती स्टार घेऊन येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना जपानमधील क्रॅश टेस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मारुतीच्या कार क्रॅश टेस्टमध्ये झिरो ते एक स्टार मिळवत आल्या आहेत. त्यांची एकच कार ब्रेझाच्या जुन्या मॉडेलने फोर स्टार मिळविले होते. परंतु आता एक अशी बातमी येत आहे की मारुती सुझुकीच्या नव्या स्विफ्टने जपानमध्ये क्रॅश टेस्टमध्ये चार स्टार सेफ्टी रेटिंग मिळविली आहे.
ग्लोबल एनकॅप आणि जपान एनकॅपमध्ये खूप फरक आहे. भारतातही क्रॅश टेस्टिंग सुरु झाली आहे. यामध्ये मारुती कोणत्या कार पाठविते आणि त्या किती स्टार घेऊन येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना जपानमधील क्रॅश टेस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
JNCAP ने स्विफ्टच्या क्रॅश टेस्टचा व्हिडीओ जारी केला आहे. ही कार मे महिन्यात भारतीय बाजारात येणार आहे. आता या कारमध्ये किती बदल केला जातो, जपानमधील कारच्या बॉडी, स्टीलचा वापर केला जातो की त्यातही बदल केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जपानमधील टेस्टमध्ये स्विफ्टने १९७ पाईंट्सपैकी १७७.८ पॉईंट मिळविले आहेत. या कारमध्ये अडासही आहे. क्रूझ कंट्रोल, इमरजन्सी ब्रेक आदी मुळे या स्विफ्टच्या सेफ्टीमध्ये वाढ झाली आहे. भारतात हे फिचर्स मिळणे जवळपास अशक्य आहे. जपानमधील या स्विफ्टने आपटण्याच्या चाचणीमध्ये १०० पैकी ८१ गुण मिळविले आहेत. मागील पॅसेंजरच्या सुरक्षेत चांगली वाढ झाली आहे. बाजुने आदळण्याच्या टेस्टमध्ये प्रवाशांच्या मानेला दुखापत झालेली नाहीय.
भारतात लाँच होणाऱ्या स्विफ्टमध्ये ही सुरक्षा फिचर्स असण्याची शक्यता कमी असल्याने जपानच्या क्रॅश टेस्टचा फारसा उपयोग होणार नाही. यामुळे भारतातील स्विफ्टला स्वतंत्र क्रॅश टेस्टमधून जावे लागणार आहे. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी टाटाच्या नेक्सॉनला जीएनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते. तेव्हा जीएनकॅपच्या सीईओंनी भारतात येऊन मारुतीला अशा सुरक्षिक कार बनविण्याचे आव्हान दिले होते. आजतागायत मारुतीला फाईव्ह स्टार रेटिंग देणाऱ्या कार बनविता आलेल्या नाहीत.