Activa चा धुमाकूळ! ३० दिवसांत विकल्या १.४५ लाख स्कूटी; ज्युपिटर, एक्सेसला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:10 AM2022-03-25T11:10:20+5:302022-03-25T11:11:02+5:30

होंडा अ‍ॅक्टिव्हा बेस्ट सेलिंग स्कूटर ठरली असून, स्पर्धक कंपन्या याच्या आसपासही नाहीत. पाहा, डिटेल्स...

honda activa becomes best selling scooter in the month of february 2022 know all details | Activa चा धुमाकूळ! ३० दिवसांत विकल्या १.४५ लाख स्कूटी; ज्युपिटर, एक्सेसला धोबीपछाड

Activa चा धुमाकूळ! ३० दिवसांत विकल्या १.४५ लाख स्कूटी; ज्युपिटर, एक्सेसला धोबीपछाड

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांमध्ये देशात स्कूटीची विक्री प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे दिसत आहे. स्कूटी सेगमेंटमध्ये अनेकविध कंपन्यांनी आपली विविध प्रकारची मॉडेल बाजारात सादर केली आहेत. मात्र, Honda Activa ने या सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या विक्रीनुसार, सर्व स्पर्धकांना मात देत होंडा अ‍ॅक्टिव्हा क्रमांक १ वर कायम आहे. 

फेब्रुवारी महिन्यात टॉप १० बेस्ट सेलिंग स्कूटर्सची लिस्ट समोर आली आहे. सन २०२२ च्या दुसऱ्या महिन्यातही होंडा अ‍ॅक्टिव्हाने आपली पकड कायम ठेवली आहे. गेल्या महिन्यात होंडा अ‍ॅक्टिव्हा TVS Jupiter (टीव्हीएस जुपिटर), Suzuki Access (सुजुकी एक्सेस), TVS Ntoq (टीवीएस एनटॉर्क) आणि Hero Pleasure (हीरो प्लेजर) सारख्या बेस्ट सेलिंग स्कूटरला मागे टाकून बेस्ट सेलिंग स्कूटरचा खिताब आपल्या नावावर केला आहे.

केवळ ३० दिवसांत १.४५ लाख स्कूटरची विक्री

फेब्रुवारी महिन्यात होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या १ लाख ४५ हजार ३१७ युनिट्सची विक्री झाली होती. गत वर्षी याच कालावधीच्या तुलनेत याची विक्री ३१ टक्के कमी झाली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये २.०९ लाख अ‍ॅक्टिव्हा विक्री झाल्या होत्या. यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत याची विक्री वाढली आहे. जानेवारी महिन्यात होंडा अ‍ॅक्टिव्हा १.४३ लाख लोकांनी खरेदी केली होती.

सर्व स्पर्धक कंपन्या जवळपासही नाहीत

होंडा अ‍ॅक्टिव्हाची गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत घसरण झाली आहे. परंतु, असे असूनही भारतात ही सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर ठरली आहे. टीव्हीएस ज्युपिटर गेल्या महिन्यात देशातील दुसरी सर्वांत जास्त विकणारी स्कूटर ठरली आहे. याला ४७ हजार ९२ ग्राहकांनी खरेदी केली आहे. तिसऱ्या नंबरवर ३७ हजार ५१२ यूनिट्सच्या विक्री सोबत सुझुकी अॅक्सेस तिसऱ्या नंबरवर आहे. टीव्हीएस जुपिटर दुसरे सर्वात जास्त विक्रीचे स्कूटर आहे. परंतु, होंडा अॅक्टिवाच्या तुलनेत ३ पट जास्त अंतर आहे.

दरम्यान, Honda Activa 125 ची किंमत ७४,१५७ रुपयांपासून ते ८१,२८० रुपयांपर्यंत आहे. Honda Activa 6G ची किंमत     ७०,५९९ रुपयांपासून ते ७२,३४५ रुपयांपर्यंत आहे. तर, Activa Anniversary Edition ची किंमत ७८,७२५ रुपयांपासून ते ८२,२८० रुपयांपर्यंत आहे. 
 

Web Title: honda activa becomes best selling scooter in the month of february 2022 know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.